Aditya Thackeray | मुख्यमंत्र्यांकडून नव्हे तर फडणवीसांकडून अपेक्षा, ते अब्दुल सत्तारांवर कारवाई करतील- आदित्य ठाकरे

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांच्यावर टीका करताना वादग्रस्त विधान केले आहे. यावरुन राज्यातील राजीकीय वातावरण (Maharashtra Politics) चांगलेच तापले आहे. शिवसेनेचे आमदार (Shivsena MLA) आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आज अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच उपमुख्यमंत्री जबाबदारी घेणार का? असा प्रश्नही त्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना विचारला आहे. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आज औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले, मी काल काही रिपोर्ट बघितले. त्यानुसार सत्तारांनी यापूर्वीही असे प्रकार केले आहेत. त्यांचे नाव टीईटी घोटाळ्यातही (TET Scam) आले होते. सुप्रिया सुळे एक खासदार आहेत. परंतु कोणत्याही महिलेला अशी शिविगाळ करणं हा घाणेरडा आणि गलिच्छ प्रकार आहे. त्यांच्या मनात जे आहे, ते लोकांसमोर आले आहे. त्यामुळे दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एकतर त्यांना आता पदमुक्त करणं गरजेचं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी घेणार का? कारण आम्हाला मुख्यमंत्र्यांकडून (CM) अपेक्षा नाही. दुसरं म्हणजे राष्ट्रीय महिला आयोगाकडेही (National Commission for Women) आता सर्वांचे लक्ष लागले आहे. महिला सुरक्षा महत्त्वाची असेल, तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. सत्तारांनी हद्द पार केली आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

कृषीमंत्री ‘अब्दुल गद्दार’

दरम्यान, काल बुलढाणा येथील सभेत आदित्य ठाकरेंनी अब्दुल सत्तारांच्या विधानाचा समाचार घेतला होता.
आपल्या राज्यात एक घटनाबाह्य कृषीमंत्री आहेत. त्यांचं नाव ‘अब्दुल गद्दार’ आहे.
या मंत्री महोदयांनी सुप्रिया सुळेंबाबत वापरलेला शब्द अतिशय घाणेरडा आहे.
तो शब्द मी उच्चारुदेखील शकत नाही. त्यामुळे मी थेट प्रश्न केंद्र सरकारला (Central Government)
विचारतो की, असे लोकं तुम्हाला हवे आहेत का? असे ठाकरे म्हणाले.

Web Title :-  Aditya Thackeray | aditya thackeray criticized abdul sattar statement on supriya sule

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics | अब्दुल सत्तारांच्या वादग्रस्त विधानावरुन राजकीय वातावरण तापलं, राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट; केली ‘ही’ मागणी

Suryakumar Yadav | ‘सूर्याला तोड नाही; त्याच्यासारखं खेळणं प्रत्येकाला शक्य नाही!’ ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ माजी दिग्गजाचे मोठे वक्तव्य