Aditya Thackeray | मंगलप्रभात लोढांच्या विधानाची टीका करणाऱ्यांमध्ये आदित्य ठाकरेंची भर; ट्विटद्वारे म्हणाले, “गद्दारांची तुलना छत्रपती शिवरायांशी करणं म्हणजे…”

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेले अनेक दिवस शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या सादरीकरणावरून किंवा शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यांमुळे महाराष्ट्राचे राजकारण तापत आहे. आधी ‘हर हर महादेव’ आणि ‘वेडात मराठे वीर दौडले सात’, या दोन चित्रपटांमुळे महाराष्ट्राचे राजकारण तापले. नंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण तापले. पुन्हा बुधवारी (३० नोव्हेंबर) महाराष्ट्राचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या विधानामुळे शिवाजी महाराजांचा अपमान झाला, असा आरोप विरोधी पक्षाने लोढांवर केला. आता या वादात युवासेना अध्यक्ष आणि माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी उडी घेतली आहे. गद्दारांची तुलना शिवाजी महाराजांशी करणे म्हणजे हिंदुत्व नसून महाराष्ट्रद्वेष आहे, असे आदित्य ठाकरे (Aditya Thackeary) ट्विट करत म्हणाले.

 

त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) लिहितात, ‘इमान विकलेल्या गद्दारांची तुलना छत्रपती शिवरायांशी करणं हे हिंदुत्व नाही, हा महाराष्ट्रद्वेष आहे! ‘महाराष्ट्राचं खच्चीकरण’ हेच या खोके सरकारचं ध्येय आहे!’ गेले अनेक दिवस घडणाऱ्या घडामोडींना महाराष्ट्राचे खच्चीकरण करण्याचा कट असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यासाठी केंद्रातून प्रयत्न होत असून, महाराष्ट्राचे आर्थिक आणि सामाजिक खच्चीकरण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून जाणे, कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील गावांवर दावा करणे, महाराष्ट्रातून विदर्भ वेगळा करण्याचा प्रयत्न असो किंवा मग शिवाजी महाराजांवर सातत्याने होणारा हल्ला असो, हे सर्व महाराष्ट्राचे खच्चीकरण करण्यासाठी चाललेले प्रयत्न आहेत.

बुधवारी (३० नोव्हेंबर) प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा झाला. तिथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडाला शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेची उपमा दिली होती.
त्यामुळे विरोधी पक्षांनी त्यांच्या या विधानाचा निषेध केला होता. यात संजय राऊत, अजित पवार यांसारखे दिग्गज नेते सहभागी होते.
आता या यादीत आदित्य ठाकरेंची भर पडली आहे. शिवप्रतापदिनी लोढा म्हणाले, “शिवराय आग्र्यातून बाहेर पडले,
तसेच शिंदे बाहेर पडले. औरंगजेबाने शिवरायांना रोखलं तसंच शिंदेंनाही कुणीतरी रोखलं होतं.
शिवराय स्वराज्यासाठी बाहेर पडले, तर शिंदे महाराष्ट्रासाठी.”

 

Web Title :- Aditya Thackeray | aditya thackeray criticizes bjp and mangal prabhat lodha for comparing eknath shinde to shivaji maharaj

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळला ‘त्या’ प्रकरणात उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

RSS Nagpur Headquarter | नागपूरमधील संघाचे मुख्यालय उडवून देण्याचे धमकी पत्र पाठवणारा अटकेत

Jack Flint | लग्नानंतर काही तासांतच ‘या’ प्रसिद्ध गायकाने घेतला जगाचा निरोप

Achanta Sharath Kamal | अंचता शरथ कमल यांना ‘खेलरत्न’ पुरस्कार जाहीर; राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे वितरण