
Aditya Thackeray | आदित्य ठाकरे झाले भजनामध्ये दंग; टाळ वाजवतानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल (व्हिडिओ)
कोकण : पोलीसनामा ऑनलाइन – माजी पर्यावरण मंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे सध्या कोकण दौऱ्यावर (Konkan Tour) असून पक्षबांधणीचे त्यांचे प्रयत्न चालू असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या या दौऱ्यामुळे कोकणातील शिवसेना ठाकरे गटातील (Shiv Sena Thackeray Group) पदाधिकाऱ्यांचे मनोबल वाढत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा टाळ वाजवत भक्तीमध्ये तल्लीन झालेला व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. शिवसैनिकांना त्यांचे हे साधे राहणीमान भावले असून अनेकांनी त्या व्हिडिओखाली कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तसेच विरोधकांनी आदित्य ठाकरेंवर टीका देखील केली आहे.
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे कोकण दौऱ्यावर असून कोकणातील खास गणेशोत्सव (Ganeshotsav) साजरा करताना
ते दिसून येत आहेत. दौऱ्याच्या सुरुवातीला आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) वैभव नाईक (Vaibhav Naik)
यांच्या आरोंदा गावातील निवासस्थानी भेट दिली. यावेळी नाईक कुटुंबियांच्या बाप्पाचे आदित्य ठाकरेंनी दर्शन घेतले.
त्यानंतर खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांच्या घरी जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले.
यावेळी राऊत कुटुंबाने देखील आदित्य ठाकरे यांचे ओवाळून जंगी स्वागत केले.
तसेच आदित्य यांनी गणपतीचे दर्शन घेतले आणि त्यांना चालू असलेल्या भजनामध्ये सहभागी होण्याचा मोह आवरला नाही.
आदित्य ठाकरे यांनी विनायक राऊत यांच्या घरी हाती टाळ घेत भजनामध्ये सहभाग घेतला.
तुझ्या भक्तीत दंग, चढू दे भजनास रंग अशी भजने गात युवासेनाप्रमुख भक्तीगितांमध्ये तल्लीन झालेले दिसून आले.
टाळ वाजवून त्यांनी भजनामध्ये सहभाग घेतल्यामुळे आणि त्यांच्या साधेपणावर अनेक शिवसैनिकांनी कौतुक केले आहे.
तर यावर शिंदे गटाचे (Shinde Group) मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी टीका केली आहे.
केसरकर यांच्या टीकेवर प्रत्युत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले ‘मी तर महाराष्ट्रातल्या घरातच चाललो आहे. त्यांच्यासारखे गुजरात आणि दिल्लीच्या घरात तर चाललो नाही ना?’ असा पलटवार आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
आज आदित्य ठाकरेंच्या सिंधूदुर्ग दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. त्यांचा हा व्हिडिओ शिवसेना ठाकरे गटाकडून शेअर केला
जात असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update