Aditya Thackeray | आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीसांना सुनावले, म्हणाले – आमच्यावर चाळीस वार केलेत पण राज्यातल्या जनतेवर वार करू नका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आज पुणे जिल्ह्यातील तळेगाव (Talegaon, Pune) येथे शिवसेनेने (Shivsena) केलेल्या आंदोलनाला नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) उपस्थित होते. यावेळी त्यांनी शिंदे- फडणवीस सरकारचा (Shinde-Fadnavis Government) खरपुस समाचार घेतला. आदित्य म्हणाले, रोजगारासाठी तरुणांना लाठी खावी लागते हे दुर्दैव आहे. राज्यातील सध्याचे सरकार नसून ती एक सर्कस आहे. सध्या राज्यातील तरुणांचा रोजगार जातोय. मविआ सरकार (Maha Vikas Aghadi Government) असते तर वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प (Vedanta Foxconn Project) महाराष्ट्रात आणलाच असता. आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) नेतृत्वात आज तळगावमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.

बंडखोर शिंदे गटाला (Shinde Group) आव्हान करताना आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले, चाळीस आमदारांसोबत मीही राजीनामा देतो, सर्वांनी निवडणुकीला सामोरे जाऊ. फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याने शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. या आंदोलनाला हजारो शिवसैनिक (Shiv Sainik) एकत्र आले होते, त्यांनी राज्य सरकारचा (State Government) निषेध केला. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, आम्ही केंद्राला किंवा गुजरातला दोष देत नाही, हा दोष खोके सरकारचा आहे. महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरतेचा फायदा गुजरातने घेतला. सध्या राज्याचे खरे मुख्यमंत्री कोण हेच कळत नाही.

आदित्य पुढे म्हणाले, माझ्या गटात कोण येते आहे, त्यापेक्षा महाराष्ट्रात रोजगार कोण आणत आहे ते पाहा.
आमच्यावर चाळीस वार केलेत पण राज्यातल्या जनतेवर वार करू नका.
शिंदे सरकार हे सरकार नसून ती एक सर्कस आहे, असे आदित्य म्हणाले.

 

Web Title :- Aditya Thackeray | aditya thackeray in talegao janakrosh morcha foxconn to gujarat due to failure of khoke sarkar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

PFI च्या ‘आंदोलनात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा नाहीच; पुणे पोलिसांचा खुलासा

Jalgaon Accident News | जळगावमध्ये भीषण अपघात ! डॉक्टर मित्रांचा जागीच मृत्यू

Eknath Shinde Group | शिंदे गटाचे हे स्टार प्रचारक भाजपात जाणार?; एकनाथ शिंदे यांना धक्का बसण्याची शक्यता