Aditya Thackeray | पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे 2 दिवसीय पुणे दौऱ्यावर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील विविध महापालिकेच्या प्रभाग रचना (pmc draft ward structure) काल (मंगळवार) जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांनी निवडणुकीची (PMC Elections) तयारी केली असून पुणे महापालिकेत (Pune Corporation) देखील सर्वच राजकीय पक्षांच्यावतीने तयारी सुरू झाली असून येत्या 6 आणि 7 तारखेला शिवसेनेचे नेते (Shiv Sena Leader) पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे दोन दिवसीय पुणे (Pune) दौऱ्यावर येत असून या दौऱ्यात आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे विविध कामांचे उदघाटन आणि पक्षातील नेत्यांची बैठक घेणार आहे.

 

 

आगामी महापालिका निवडणुकीबाबत आखणार रणनीती
पुणे महापालिकेच्या प्रभाग रचना जाहीर (Pune Corporation Ward Structure) झाल्यानंतर प्रत्येक पक्षाच्यावतीने स्वबळाचा नारा देण्यात येत आहे. राज्यात जरी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असली तरी स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP), काँग्रेस (Congress), आणि शिवसेनेच्यावतीने स्वबळाची तयारी करण्यात आली आहे. मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे रविवारी आणि सोमवारी पुणे दौऱ्यावर असून या दोन दिवसात विविध विकास कामाचं (Development Work) उदघाटन आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीबाबत बैठक घेणार आहे. अशी माहिती शिवसेनेचे शहराध्यक्ष (Shiv Sena Pune City President) संजय मोरे (Sanjay More) यांनी यावेळी दिली.

आघाडीचा निर्णय पक्षप्रमुख घेतील
गेल्या 2 वर्षांपासून पक्षाच्यावतीने स्वबळाची तयारी सुरू असून शिवसंपर्क अभियान, शिवसंवाद कार्यक्रम घेण्यात येत
असून शहरात पक्ष वाढवण्यासाठी देखील प्रयत्न केलं जातं आहे.
पुढं आघाडी होणार की नाही याबाबतचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Party chief Uddhav Thackeray),
आदित्य ठाकरे आणि संजय राऊत (Sanjay Raut) घेतील.पण आम्ही आमची स्वबळाची तयारी केली असल्याचं यावेळी मोरे यांनी सांगितलं.

 

Web Title :- Aditya Thackeray | Aditya Thackeray on a 2-day tour of Pune on the backdrop of Pune Municipal Corporation elections

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

IAS Couple News | IAS पती विरोधात महिला IAS ची पोलिसांत धाव; म्हणाली – ‘हनीमूनला समजलं की तो…’

 

Nitesh Rane | भाजपचे आमदार नितेश राणेंना न्यायालयीन कोठडी

 

Ways to Lose Belly Fat | पोटाची चरबी कमी करण्यासाठी अवलंबा ‘या’ 6 सोप्या पद्धती; जाणून घ्या

 

Pune Crime | मोबाईल चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक, एक लाखाचा मुद्देमाल जप्त