Aditya Thackeray | चिन्हाबाबत आदित्य ठाकरेंचे स्पष्ट मत, म्हणाले – हा प्रश्न शिवसेना, धनुष्यबाण, ठाकरे परिवार…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – निवडणूक आयोगाने मुळ शिवसेनेला, शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena-Uddhav Balasaheb Thackeray) हे नाव आणि धगधगती मशाल हे पक्षचिन्ह (Mashal Symbol) दिले. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना (Shivsena of Balasaheb) असे नाव आणि ढाल-तलवार हे चिन्ह दिले. यानंतर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) म्हटले होते की, आमच्याकडे बहुमत असल्याने ‘धनुष्यबाण’ चिन्ह (Dhanushyaban Symbol) आम्हाला मिळायला हवे होते. यावर आता शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले, आयोगाच्या (Election Commission) निर्णयाचे काय होते हे बघणे गरजेचे आहे. कारण हा प्रश्न शिवसेना, धनुष्यबाण, ठाकरे परिवार यांच्याबद्दल राहिलेला नाही. हा प्रश्न न्यायव्यवस्थे संदर्भात आहे. न्याय होणार आणि आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे. संविधान (Constitution) आणि लोकशाहीबद्दल (Democracy) मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर मला वाटते की फक्त देशाचे नाही संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले आहे.

3 नोव्हेंबरच्या अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीबरोबरच (Andheri East by-election)
आगामी निवडणुकांमध्ये बाळासाहेबांचे विचार आणि संपूर्ण कॅडर कोणाकडे आहे हे कळेल, असे म्हटले असता,
आदित्य ठाकरे म्हणाले, तुम्ही जे सांगितलं ते ऐकून आज मला बच्चनसाहेबांचा (Amitabh Bachchan) वाढदिवस असल्यानिमित्त एकच शब्द आठवतोय तो म्हणजे ‘अग्निपथ’ हेच शब्द मी आज सगळीकडे घेऊन फिरत आहे.

काय म्हणाले होते शिंदे

निवडणूक आयोगाने चिन्ह दिल्यानंतर शिंदे म्हणाले होते, हा निर्णय आमच्यासाठी अन्यायकारक आहे.
धनुष्यबाण चिन्ह बहुतमच्या आधारे आम्हाला मिळायला हवे होते. आमच्याकडे 70 टक्के बहुतम आहे.
चिन्ह आणि पक्षासंदर्भातील आमचा दावा कायम आहे.

Web Title :- Aditya Thackeray | aditya thackeray react on question of what if shivsena name bow arrow symbol goes to cm eknath shinde group

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा