युवानेते आदित्य ठाकरेंचं ‘इलाका हमारा, धमाका भी हमारा’ असं म्हणत ठाकूरांना खुलं आव्हान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांचे नेते चांगलेच सक्रिय झाले असल्याचे दिसून येत आहे. जनआशीर्वाद यात्रा नालासोपाऱ्यात पोचली असता युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्यावर जोरदार टीका केली.

तसेच हितेंद्र ठाकूर यांना उघड-उघड आव्हानही दिले. आदित्य ठाकरे म्हणाले की, आत्तापर्यंत असं होतं की, ‘इलाका तुम्हारा धमाका हमारा’ परंतु आता ‘इलाका हमारा, धमाका भी हमारा’ असे आव्हान ठाकूर यांना दिले. तसेच ठाकरे यांनी येथील सभेत पालघर येथील गुंडगिरी मोडून काढण्याचे संकेत दिले. तसेच जनआशीर्वाद यात्रेला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

ठाकरे म्हणाले की, एन्काउंटर फेम प्रदीप शर्मा यांनी आता हातात शिवबंधन बांधले आहे. त्यामुळे ठाकूर यांची मागच्या अनेक वर्षांपासूनची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी ते नालासोपाऱ्यातून निवडणूक लढविण्याची शक्यता वर्तवली आहे. राज्यात होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दररोज राजकीय नेत्यांच्या एकमेकांवर कुरघोड्या होत असताना दिसत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like