संजय राऊतांच्या पवार भेटीचं आदित्य ठाकरे ‘कनेक्शन’ ? विधानसभेसाठी वेगळी ‘समीकरणं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडताना दिसल्या. शरद पवार त्यांच्या सिल्वहर ओक या निवासस्थानी असताना शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीमागील गूढ समोर आलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी संजय राऊत यांनी शदर पवार यांची भेट घेतली होती. सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. आदित्य ठाकरे यांच्याविरोधात शिवसेनेने उमेदवार देऊ नये अशी विनंती शिवसेनेकडून करण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने उमेदवार दिला नव्हता. त्याप्रमाणे आता राष्ट्रवादीनेही देऊ नये अशी शिवसेनेची इच्छा आहे.

वरळीमधून आदित्य ठाकरेंच्या नावाची घोषणा
वरळी विधानासभा मतदारसंघात आज शिवसेनेचा विजय संकल्प मेळावा होणार आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आज वरळी विधानसभा मतदारसंघातून अधिकृत उमेदवार म्हणून आदित्य ठाकरे यांच्या नावाची घोषणा करणार आहेत. मुख्य म्हणजे आदित्य ठाकरे निवडणूक लढवणारे पहिले ठाकरे ठरणार आहेत.

Visit : Policenama.com