Aditya Thackeray | ‘गलिच्छ राजकारण आणि गद्दारी मला निःस्वार्थपणे काम करण्यापासून रोखू शकणार नाही’; आदित्य ठाकरेंचे वरळीकरांना भावुक पत्र

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन- ‘जूनमध्ये गलिच्छ राजकारण आणि गद्दारी करून लोक हिताचा विचार करणारे सरकार पाडलं गेलं. पण ते आम्हाला निःस्वार्थपणे काम करण्यापासून आणि आपली सेवा करण्यापासून रोखू शकणार नाहीत. आम्ही तुमचा आशीर्वाद आणि प्रेमासाठी काम करतच राहू आणि हेच आम्हाला पुढे ऊर्जा देत राहील,’ अशी भावनिक साद घालत आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) त्यांच्या मतदार संघाला पत्र लिहिले आहे. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) वरळी (Varali) येथून निवडून आले होते. त्यांनी या मतदार संघाला पत्र लिहून आभार मानले आहेत.

आदित्य ठाकरे वरळी येथून निवडून येऊन पहिल्यांदा आमदार (MLA) झाले. या घटनेला आता तीन वर्ष झाली आहे. या निमित्ताने त्यांनी त्यांच्या मतदार संघाला पत्र लिहिले आहे. ‘महाराष्ट्र विधानसभेमध्ये (Maharashtra Vidhansabha) तुमचा प्रतिनिधी (Presentative) म्हणून माझी निवड होऊन ३ वर्षे झाली आहेत. या ३ वर्षात आपल्या प्रेमाने मला आशीर्वादित केले आहे. आणि मी प्रार्थना करतो की हेच प्रेम आणि तुमचे आशीर्वाद कायम माझ्यासोबत राहोत. माझ्या निवडणुकीपूर्वी मी तुम्हाला वरळी A+’ चे वचन दिले होते. गेल्या ३ वर्षात वरळीला प्रगती आणि समृद्धीच्या मार्गावर नेण्यासाठी आपण सर्व एक संघ म्हणून काम करत आहोत.’

‘नवीन बस थांबे असोत, चांगले फुटपाथ, मजबूत रस्ते असोत, हिरवीगार मोकळ्या जागा असो, किंवा
सामुदायिक स्तरावर व वैयक्तिक स्तरावर लसीकरण ड्राइव्ह आणि इतर समस्येचे निराकरण असो आपण
वरळीकरांच्या सहकार्याने करत आलो आहोत. म्हणूनच राजकीयदृष्ट्याही प्रत्येक पक्षाला देखिल वरळीत वेळ
आणि पैसा खर्च करायचा असतो. आपल्या वरळीवर त्यांचे लक्ष त्यांनी वरळीत लावलेले बेकायदेशीर बॅनर
आणि त्यावर होणारा खर्च यामुळे मला खात्री पटते की वरळी हेवा वाटावा अशी प्रगती करतेय आणि त्यांना
देखील वरळीत यावस वाटतंय,’ असे आदित्य (Aditya Thackeray) पत्रात म्हणाले.

Web Title :- Aditya Thackeray | for your blessings and love aditya thackeray emotional letter to worlikars