आदित्य ठाकरेंसाठी मंत्रालयात खास ‘केबिन’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडीचा मंत्रिमंडळ विस्तारात आमदार आदित्य ठाकरे यांना कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव कॅबिनेट मंत्रिपदावर विराजमान झाल्यानंतर आता त्यांना त्यांच्यासाठी मंत्रालयात खास केबिन देण्यात आली आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर अद्याप खाते वाटप झाले नाही.

महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर मंत्रालयामध्ये सर्व मंत्र्यांसाठी लवकरच केबिन वाटप होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रालयामध्ये केबिनची पहाणी केली. यावेळी आदित्य ठाकरे यांच्यासाठी मंत्रालयातील सातव्या मजल्यावरील 717 नंबरची केबिन देण्यात येणार आहे.

मंत्रिमंडळ विस्तार झाला मात्र अद्याप खातेवाटप जाहीर झालं नाही. त्यामुळे केबिन वाटप ही झालेले नाही. तरी देखील आदित्य ठाकरे यांच्यासाठी एक खास केबिन मात्र राखीव ठेवण्यात आले आहे. या केबिनवर आद्य ठाकरे यांचे नाव देखील लिहण्यात आले आहे. आज या केबिनची पाहणी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी आणि स्वत: आदित्य ठाकरे उपस्थित होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

मधुमेह असल्यास आहारामध्ये करा ‘या’ ४ पदार्थांचा समावेश
‘हे’ ७ उपाय केल्यास सतत येणारा थकवा जाईल पळून, जाणून घ्या
जेवण पॅक करण्यासाठी ‘फॉईल पेपर’ वापरता ? ‘हे’ ७ दुष्परिणाम जाणून घ्या
मासिक पाळीत स्वच्छता राखण्यासाठी ‘या’ ६ गोष्टी लक्षात ठेवा !
गूळ खाण्याने वाढते वजन, जास्त खाण्याचे ‘हे’ ६ तोटे जाणून घ्या
मातेच्या स्तनपानामुळे बाळांना होतात ‘हे’ ६ फायदे, जाणून घ्या
लवंग खाण्याचे ‘हे’ ६ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?