आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यटन, पर्यावरण, राज्य शिष्टाचार खाती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यटन आणि राज्य शिष्टाचार ही खाती सोपविण्यात आली आहे.

मुंबई विद्यापीठातील आंदोलनापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्याकडे शिक्षण, क्रीडा ही खाती सोपविली जातील, अशी सर्वांची अपेक्षा होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याकडे पर्यटन, पर्यावरण आणि राज्य शिष्टाचार ही खाती सोपविली आहेत. पर्यावरण खाते वगळता अन्य दोन खाती ही किरकोळ समजली जातात.

राजकारणात तसेच संसदीय लोकशाहीतील शिष्टाचार आदित्य ठाकरे यांनी मजबूत करावीत, मुंबईत येणाऱ्या देशाविदेशातील राजदुत, उद्योजक, विविध देशांची शिष्टमंडळे यांच्याशी आदित्य ठाकरे यांचा संपर्क वाढावा. त्यातून त्यांचे राजकारण बहुआयामी व्हावे, यासाठी त्यांच्याकडे राज्य शिष्टाचार खाते देण्यात आले असावे.

पर्यावरणाविषयी त्यांनी कायमच संवेदनशीलता दाखविली आहे. त्यामुळे ते खातेही त्यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. त्याच्या जोडीला पर्यटन खाते देण्यात आले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/