विधानसभा 2019 : ‘या’ मतदारसंघातून शिवसेना लढणार, गणेश नाईक काय करणार ?

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – शिवसेनेचे युवाप्रमुख आदित्य ठाकरे यांची सध्या जनआशीर्वाद सुरु आहे. महाराष्ट्रातील विविध भागातून प्रवास केल्यानंतर आता त्यांची यात्रा काल नवी मुंबईत दाखल झाली. यावेळी त्यांनी या ठिकाणी मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या गणेश नाईक यांना धक्का बसला आहे.

आदित्य ठाकरे यांच्या या यात्रेचे यावेळी जोरदार स्वागत करण्यात आले. नवी मुंबईमध्ये दोन विधानसभा मतदारसंघ असून यामधील बेलापूर या ठिकाणी शिवसेना निवडणूक लढवणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यामुळे आता भाजपात प्रवेश केलेले गणेश नाईक काय करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीनंतर मी याठिकाणी परत येणार असून विजयी मेळावा घेणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली.

यामुळे जर युती झाली तर बेलापूर हा शिवसेनेकडे जाणार असून ऐरोली हा भाजपकडे जाईल. त्यामुळे आता बेलापूरमधील विद्यमान आमदार  मंदाताई म्हात्रे यांचीही उमेदवारी धोक्यात आली आहे.दरम्यान, महायुतीच्या जागावाटपाची अजून घोषणा झालेली नसताना आदित्य ठाकरे यांच्या या विधानाने युती होणार कि नाही?यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याचबरोबर युतीची घोषणा कधी होणार याकडे देखील कार्यकर्ते डोळे लावून बसलेले आहेत.