वरळीमधून आदित्य ठाकरे 16 हजार मतांनी आघाडीवर

वरळी : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे वरळीमधून 16 हजार मतांनी आघाडीवर आहेत. ठाकरे घराण्यातील पहिला ठाकरे वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. वरळीचे विद्यमान आमदार सुनील शिंदे यांच्याऐवजी शिवसेनेने आदित्य ठाकरे यांना वरळीतून उमेदवारी दिली आहे.

वरळी मतदारसंघात शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अ‍ॅड. सुरेश माने यांच्यात प्रमुख लढत होत आहे. या मतदारसंघातून बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेही निवडणूक लढवत आहे.आदित्य ठाकरे हे निवडणूक रिंगणात असल्यानं ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे.

वरळी मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. 2009 ची निवडणूक वगळता 1990 पासूनच्या सहा निवडणुकीत इथे शिवसेनेचाच उमेदवार निवडून आला आहे.

Visit : Policenama.com