आदित्य ठाकरे यांच्या रोड शो दरम्यान चोरट्यांचा ‘धुमाकूळ’ !

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मतदान करणाऱ्या मतदारांचे आभार मानण्यासाठी आणि शिवसेनेला मतदान केले नाही, त्या मतदारांची मने जिंकण्यासाठी शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी जळगावमधील पाचोरा येथून ‘जन आशीर्वाद यात्रा’ सुरू केली. जळगाव नंतर आज सकाळी धुळ्यात आदित्य ठाकरे यांचा रोड शो आयोजित करण्यात आला होता. या रोड शो दरम्यान चोरट्यांनी अनेकांचे महागडे मोबाईल आणि पैशांवर डल्ला मारला.

आज सकाळी धुळ्यातील दसेरा मैदान चौकापासून मोटरसायकल रॅली, रोड शो चे आयोजन करण्यात आले होते. रॅलीमध्ये तरुण, तरुणी सहभागी झाले होते. हि रॅली दसेरा चौकातून खंडेराय बाजार चौकात आली असता गर्दीचा फायदा घेत तरुणांचे महागडे मोबाईल, राजकीय लोकांच्या खिशातील पाकिटांवर, पत्रकारांचे खिशातील हजारो रुपयांच्या रोख रक्कम चोरट्यांनी हातचालाखी करत चोरून नेली. रॅलीच्या दरम्यान चौकाचौकात पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता. पोलीस बंदोबस्त असताना ही चोरट्यांनी चोरी केल्याने आश्चर्य़ व्यक्त करण्यात येत आहे. या अगोदर राहुल गांधी यांच्या रोड शो दरम्यान अशाच पध्दतीने चोरट्यांनी लुट केली होती.

खंडेराव बाजार चौकात रॅली आली असता माजी नगरसेवक गोविंद साखला यांचे पुतणे अक्षय विष्णु साखला यांचे जवळील ६० हजार रुपयांचा महागडा मोबाईल गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी आझाद नगर पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दिला आहे. पत्रकार मनोज गर्दे यांचे खिशातील १४ हजार ५०० रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. गर्देनी पोलीसांकडे लेखी तक्रार दिली आहे. अन्य राजकीय पदाधिकारी यांचे खिशावर हि चोरट्यांनी हात साफ केल्याच्या घटना घडल्या आहे.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like