Aditya Thackeray | आदित्य ठाकरेंचा शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल; म्हणाले – ‘मी विचारलेले प्रश्न…’

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर थोड्याच दिवसात वेदांता फॉक्सकॉनचा एक मोठा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला. त्यानंतर महाराष्ट्रात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले. पहिल्यांदा महाविकास आघाडीने शिंदे फडणवीस सरकारवर महाराष्ट्राच्या हातातील प्रकल्प गुजरातच्या ताटात ठेवण्याचा आरोप केला. यावर शिंदे फडणवीस सरकारने वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प हा महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रातून गेल्याचा आरोप केला. त्या आरोपाला प्रत्युत्तर म्हणून आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) २९ नोव्हेंबरला मुंबईत पत्रकार परिषद घेऊन एक पत्र पुरावा म्हणून सादर करत शिंदे सरकारच्या काळात प्रकल्प महाराष्ट्रातून गेल्याचा दावा केला आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेने पुरावा नाकारला आहे. त्यानंतर आज पुन्हा आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले, “एका माणसाच्या (एकनाथ शिंदे) राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे महाराष्ट्र मागे पडतोय. उद्योग मंत्री असून सुद्धा उदय सामंत यांना काम करताना मी कधीच पाहिलेलं नाही. या संपूर्ण प्रोसेसमधून राज्य सरकारने त्यांना बाहेर ठेवलेलं आहे. ज्यांचा या खात्याशी काहीही संबंध नाही ते का उत्तर देत आहेत. मी विचारलेले प्रश्न घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे. त्यांनी मंचावर बसावं आणि माझ्याबरोबर मीडियासमोर डिबेट (वाद-विवाद) करावी.”

आगामी हिवाळी अधिवेशनात सरकारला घेरण्याची रणनीती ठरवण्यासाठी आज (३० नोव्हेंबर)
महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत आदित्य ठाकरे सहभागी होते.
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवरून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार
हल्ला चढवला. आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माध्यमांसमोर त्यांच्याबरोबर चर्चा करण्याचे
आव्हान दिले आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नसली तरी भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे
गटातील नेत्यांनी त्यांच्या आव्हानाला प्रत्युत्तर दिले आहे.

Web Title :- Aditya Thackeray | maharashtra is falling behind because of one mans monstrous ambition aaditya thackeray attacked cm eknath shide maharashtra politics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vikram Gokhale | विक्रम गोखलेंच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित; ‘सूर लागू दे’ लवकरच थिएटरमध्ये धडकणार

Nadav Lapid | ‘नदाव लॅपिड म्हणजे इस्रायलमधील जितेंद्र आव्हाड’ – अतुल भातखळकर