१०वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘अंतर्गत गुण’ देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अकरावी प्रवेश प्रक्रियेत राज्य मंडळांच्या विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त तुकड्या वाढविण्याच्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तसेच या शैक्षणिक वर्षापासून पुन्हा अंतर्गत गुण सुरू करण्यात यावे, यासंदर्भात आदेश दिले असल्याची माहिती शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. अकरावी प्रवेशावरुन निर्माण झालेल्या प्रश्नांबाबत आदित्य ठाकरे यांनी काल बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीबाबत माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीविषयी माहिती देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांसोबत झालेली बैठक सकारात्मक झाली. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून अंतर्गत गुण आणि अकरावी प्रवेश प्रक्रियेत राज्य मंडळांच्या विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त तुकड्या वाढविण्याच्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद दिला आहे. लवकरच त्याची अमंलबजावणी होईल.

विद्यार्थ्यांचे तोंडी परीक्षेचे अंतर्गत गुण कमी केल्याचा फटका यंदाच्या निकालाला बसला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या निकालाच्या घसरलेल्या टक्केवारीबाबत आदित्य ठाकरे यांनी वर्षा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व आपल्या मागण्या मांडल्या.

आदित्य ठाकरेंच्या मागण्या –

अंतर्गत गुणांअभावी यंदा राज्याचा निकाल कमी लागला आहे. त्यामुळे एस. एस. सी. बोर्डाच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळणार की नाही? हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अंतर्गत गुण सुरु करावे. तसेच एसएससीच्या विद्यार्थ्यांना अन्य बोर्डांतील विद्यार्थ्यांच्या स्पर्धेत आणण्यासाठी अंतिम निकालात त्यांचे अंतर्गत गुणही ग्राह्य धरण्यात यावेत. अकरावी प्रवेशात त्यांच्यासाठी स्वतंत्र तुकडी करण्यात यावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं केली आहे.

सिनेजगत

अमेरिकेतील कॉन्सर्टमध्ये दिसला ‘मिसेस सीएम’ अमृता फडणवीस यांचा ‘रॉकस्टार’ व ‘ग्लॅमरस’ लुक !

#MeToo : अभिनेत्री तनुश्री दत्‍ता आणि नाना पाटेकर, आरोप प्रकरणाची मोठी बातमी ; घ्या जाणून

#Video : ‘तशा’ अवस्थेत देखील अभिनेत्री प्रियकांने केला ‘असा’ डान्स, सर्वजण झाले चकित

‘डीप नेक’ ड्रेसमध्ये इलियाना डिक्रूजचा ‘बोल्ड’ वीडियो व्हायरल, दिलकश अदाने चाहत्यांना केले ‘घायाळ’