Aditya Thackeray On Shivsena Rebel MLA | शिवसेनेचे बंडखोर आमदार विधान भवनात दाखल होताच आदित्य ठाकरे म्हणाले – ‘कसाबलाही असं आणलं नसेल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Aditya Thackeray On Shivsena Rebel MLA | शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आमदारांचा मोठा बाहेर काढून केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेना आणि शिंदे गटात सातत्याने आरोप-प्रत्यारोप, टिका-टिपण्णी होत आहे. आता बंडखोर एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले असून आज विधानसभा अध्यक्षांची निवडसुद्धा करण्यात आली आहे. अध्यक्ष निवडीसाठी एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदार कडेकोट बंदोबस्तात विधानभवनात दाखल झाल्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी बोचरी टिका केली आहे. कसाबलाही अशाप्रकारे आणले नसेल असे आदित्य यांनी म्हटले आहे. (Aditya Thackeray On Shivsena Rebel MLA)

 

विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी दोनदिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. अध्यक्ष निवडीसाठी आज मतदान देखील झाले. तत्पूर्वी अधिवेशनात कोणी कोणता पक्षादेश पाळायचा, यावरून शिवसेना आणि शिंदे गटात तीव्र संघर्ष सुरूआहे. त्यामुळे कडेकोट पोलीस बंदोबस्तात बसमधून शिवसेना बंडखोर आमदार हे विधान भवनात दाखल झाले. यावेळी या आमदारांसोबत भाजपाचे आमदार देखील होते. याबाबत माध्यमांशी बोलताना शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना टोला लगावला आहे.

बसमधून इथे आणलेल्या आमदारांबद्दल मला वाईट वाटत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आले आहे. कसाबच्या वेळीदेखील इतका बंदोबस्त लावण्यात आला नव्हता. कसाबलाही असे आणले नसेल. कोणी पळणार आहे का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला. तसेच शिवसेनेचाच व्हीप अधिकृत आहे असेही ते म्हणाले.

 

दरम्यान, आज विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांचा विजय झाला आहे.
नार्वेकर यांना या निवडणुकीत एकूण 164 मते मिळाली. तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांना 107 मते मिळाली.
या मतदानात रईस शेख, अबू आझमी आणि शाह फारुख अन्वर हे आमदार तटस्थ राहिले.

 

Web Title :- Aditya Thackeray On Shivsena Rebel MLA | aditya thackeray reaction after shivsena rebel mla entered the vidhan bhavan

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Child Saving Plan | आई-वडिलांनी ‘या’ योजनेत रोज जमा करावे अवघे 67 रुपये, 5 वर्षात तुमचे मुल होईल लखपती

 

Shivajirao Adhalrao Patil | शिवसेना अजूनही गोंधळलेली रात्री हकालपट्टी, सकाळी इन्कार ! शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेनेतच

 

Multibagger IPO | ₹ 102 वरून 7500 रुपयांवर पोहोचला ‘या’ कंपनीचा शेअर, वर्षभरात रू. 90 लाख नफा, 7300% रिटर्न