Aditya Thackeray | राज्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी आदित्य ठाकरेंचा ‘बिग प्लॅन’, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – ज्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी अस्तित्वात असलेल्या इलेक्ट्रिक वाहन धोरणामध्ये (Electric vehicle policy) सुधारणा करण्यात आली आहे. यासाठी अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीने इलेक्ट्रिक वाहन धोरण 2021 तयार करुन पर्यावरण विभागाला (Department of the Environment) सादर केले आहे. समितीच्या धोरणाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली असल्याची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील प्रदुषण (Pollution) कमी करण्यासाठी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

यासंदर्भात माहिती देताना आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यातील प्रदुषण कमी करण्यासाठी शाश्वत आणि प्रदुषणविरहित वाहनांना प्रोत्साहन देणार आहे. आगामी काळामध्ये इलेक्ट्रिक वाहने वापरण्यामध्ये महाराष्ट्र अग्रेसर बनवायचा आहे. याशिवाय वाहन उत्पादनात देशात महाराष्ट्र अग्रेसर असून हे स्थान कायम ठेवायचे आहे. तसेच जागतिक पातळीवर प्रमुख उत्पादक आणि गुंतवणूक केंद्रस्थान म्हणून राज्य उदयास आणण्याचे आमचे लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले.

 

शासकीय वाहनं ही इलेक्ट्रीक वाहनं

आदित्य ठाकरे यांनी पुढे सांगितले की, 2025 पर्यंत नवीन वाहन नोंदणीमध्ये 10 टक्के हिस्सा बॅटरी इलेक्ट्रीक वाहनांचा असेल. राज्यातील 6 प्रमुख शहरातील सार्वजनिक वाहतुकीच्या 25 टक्के विद्युतीकरण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती आणि नाशिक या शहरांचा समावेश आहे. याशिवाय 7 शहरांमध्ये 2025 पर्यंत 2500 चार्जिंगची सुविधा उभारण्यात येणार आहे. एप्रिल 2022 पासून राज्यातील सर्व नवीन शासकीय वाहनं ही इलेक्ट्रीक वाहनं असतील अशी मोठी घोषणा आदित्य ठाकरे यांनी केली.

Web Titel :- aditya thackeray plan electric vehicles 2022 all government vehicles will run charging

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Lightning | वीज कोसळल्याने देशात 78 लोकांचा गेला बळी; पीएम मोदींनी केली आर्थिक मदतीची घोषणा

Smartphone | जर तुमची मुले सुद्धा जास्त मोबाइल पहात असतील तर ‘या’ 6 टिप्सचा करा वापर, जाणून घ्या

Thane Crime News | धक्कादायक ! चक्क रक्ताचा टिळा लावून केला प्रेमाचा बनाव, विवाहित तरूणाचे युवतीवर लैंगिक अत्याचार