आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांचा प्रस्ताव मांडला : ‘या’ पदासाठी

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर आता शिवसेनेच्या विधानमंडळ नेतेपदी एकनाथ शिंदे यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतेपदी अजित पवार यांची निवड करण्यात आल्यानंतर आज शिवसेनेच्या आमदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

आज शिवसेना भवनात झालेल्या या बैठकीत सर्व आमदारांनी एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड केली तर सुनील प्रभू यांची पक्ष प्रतोदपदी निवड करण्यात आली आहे. सत्तेमध्ये समान वाटा देण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. मात्र भाजपने त्यावर कोणतेही उत्तर दिले असून भाजप काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, भाजपने देवेंद्र फडणवीस यांना काल विधानमंडळ नेता म्हणून निवडले असल्याने तेच पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत. त्यामुळे आता पुढे काय होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Visit : Policenama.com