Aditya Thackeray – Pune PMC | पावसाळी परिस्थितीवर दीर्घकालीन उपाय योजना करण्यासाठी पुणे शहराचा कंटूर सर्व्हे करा : शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी

पुणे : Aditya Thackeray – Pune PMC | पुण्यामध्ये पावसाळ्यात निर्माण झालेल्या परिस्थितीवर दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी शहराचा कंटूर सर्व्हे करून त्यानुसार उपाययोजना कराव्यात, अशी सूचना वजा मागणी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आज पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांच्याकडे केली. (Aditya Thackeray – Pune PMC )

पुणे भेटीवर आलेल्या आदित्य ठाकरे यांनी आज महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार (PMC Commissioner and Administrator Vikram Kumar) यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शहरात नुकतेच पावसाळ्यात निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीवर देखिल आयुक्तांशी चर्चा केली. या भेटीनंतर ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना चर्चेतील मुद्द्यांवर भाष्य केले. याप्रसंगी त्यांच्यासोबत शिवसेनेचे संपर्क प्रमुख सचिन आहीर, शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, पृथ्वीराज सुतार आदी प्रमुख पदाधिकारी, माजी नगरसेवक उपस्थित होते. (Aditya Thackeray – Pune PMC )

ठाकरे म्हणाले की आयुक्तांसोबत शहरातील प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली.
प्रामुख्याने पावसाळ्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी येऊन वाहतूक कोंडी व अन्य नुकसान झाले.
यापार्श्वभूमीवर विकास प्रक्रियेमुळे पावसाळी प्रवाह बदलत असल्याने तसेच पर्यावरणातील बदलांमुळे होणाऱ्या
अधिकच्या पावसामुळे नव्याने उपाययोजना करण्याची गरज आहे. यासाठी शहराचा कंटूर सर्व्हे करून उपाययोजना करण्याची गरज आहे.

यावेळी नदी सुधार योजनेमध्ये नागरिकांच्या शंकांचे देखील निरसन करून पुढील पावले टाकावीत अशी सूचना
आयुक्तांना करण्यात आली. तसेच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी गर्दी आणि रस्त्यांच्या रुंदीनुसार मोठया आणि
छोट्या आकाराच्या ई बसेस चे नियोजन करण्यात यावे, अशी मागणी आयुक्तांकडे केल्याचे ठाकरे यांनी नमूद केले.

Web Title :- Aditya Thackeray – Pune PMC | Do a contour survey of Pune city to plan a long-term solution to rainy conditions: Shiv Sena leader Aditya Thackeray’s demand to Municipal Commissioner

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Uric Acid | वाढली असेल सांधेदुखी तर ‘या’ 5 पद्धतीने मिळवू शकता आराम, जाणून घ्या

Tata Airbus Project | राज्यातील उद्योग गुजरातला पळवण्यासाठीच मिंदे सरकार आले; सुभाष देसाईंची जोरदार टीका