‘कोणताही शिवसैनिक इंदिराजींबद्दल अपमानास्पद बोलणार नाही’, राऊतांच्या स्पष्टीकरणानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांच्या विरोधात शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विधानानं राजकारण चांगलंच तापलं आहे. संभाजी भिडे यांनी उद्या सांगली बंदचं आव्हान केलं आहे. यावर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. कोणताही शिवसैनिक इंदिराजींबद्दल अपमानास्पद बोलणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. राऊतांच्या स्पष्टीकरणावरून असं जाणवतं की, त्यांचा हेतू स्वच्छ होता.

संजय राऊतांच्या विधानामुळं काँग्रेसमध्ये नाराजी असल्याचं दिसत आहे. याबाबत प्रश्न विचारला असता आदित्य ठाकरे म्हणाले, “संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. ते एका वेगळ्या हेतूनं बोलले, त्यांनी वेगळे संदर्भ दिले आहेत. करिम लाला पठाण संघटनेचा नेता होता. काही भेटीगाठी झाल्या असतील नसतील परंतु पत्रकार म्हणून त्यांनी त्यांचं एक निरीक्षण जगासमोर मांडलं होतं. परंतु आज त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांच्या स्पष्टीकरणात एक जाणवतं की, ज्या इंदिरा गांधींबद्दल हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना आदर होता त्यांच्याबद्दल एखाद्यानं शिवसैनिकानं चुकीचं बोलणं शक्य नाही. त्यांचा हेतू हा स्वच्छ होता. कोणताही शिवसैनिक इंदिराजींबद्दल अपमानास्पद बोलणार नाही. याआधीही बोलला नाही. स्वत: शिवसेनाप्रमुखांनाच त्यांच्याबद्दल आदर होता.” असंही ते म्हणाले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/