“पाकिस्तानचा निषेध करणे गरजेचे, मात्र कोणालाही त्रास होणार नाही, याचे भान बाळगा”

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पुलवामामधील भ्याड हल्ल्यानंतर देशभरात आक्रोश आहे. तर आजच या घटनेचा निषेध म्हणून काश्मीरी विद्यांर्थ्यांना मारहान झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत मारहान करणारे युवासेनेचे कार्यकर्त्ये होते. त्यामुळे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी यावर उत्तर दिलं आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी यवतमाळमध्ये युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण प्रकारणावर विचारण्यात आले. त्यावर त्यांनी उत्तर दिलं आहे.

यवतमाळमध्ये जे काही घडले त्याची चौकशी मी करेन, त्यानंतर कारवाईचे आदेश देईन. पुलवामा हल्ल्यामुळे देशभरात आक्रोश आहे. अशावेळी पाकिस्तानचा निषेध करणे गरजेचे आहे. मात्र, त्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही, याचे भान बाळगा, असं आवाहन त्यांनी यावेळी दिलं. आता सर्व देशवासीयांनी एकत्र राहण्याची वेळ आहे, असंही आदित्य यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, शिक्षणासाठी जम्मू-काश्मीरमधून यवतमाळमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना मारहान करण्यात आली. युवासेनेच्या १०-१२ कार्यकर्त्यांनी यवतमाळच्या वैभवनगर परिसरात काश्मीरला परत जा व ३-४ विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पीडितांकडून लोहारा पोलिसात ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर पोलीस मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांचा शोध घेत आहे.