Aditya Thackeray | ‘सत्ता गेल्यापासून देवेंद्र फडणवीस यांना वैफल्य आले’ – आदित्य ठाकरे

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Aditya Thackeray | राज्यात महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi Government) सत्तेत आल्यापासून शिवसेना (Shivsena) आणि भाजप (BJP) यांच्यात नेहमीच कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळाला आहे. मात्र, आता या वादात पर्यावरण मंत्री (Environment Minister) आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनीही उडी घेतली आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नुकतीच टीका केली होती. त्या टीकेला आदित्य ठाकरे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीसांना सत्ता गेल्यापासून वैफल्य आले आहे, असा पलटवार त्यांनी केला आहे.

 

देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार (Maharashtra Government) कुठेच दिसत नसल्याची टीका केली होती. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी १० मार्चनंतर महाविकास आघाडी सरकार पडेल असा दावा केला आहे. त्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) चंद्रपूर दौऱ्यावर असताना माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत पलटवार केला आहे. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना गेल्या दोन वर्षांपासून सरकार सत्तेत नसल्यामुळे वैफल्य आले आहे. विरोधी पक्षाच्या वागण्यात ते दिसत आहे. कधी मुख्यमंत्री (Chief Minister) आहेत असे म्हणतात तर कधी म्हणतात नाही. तर कधी सरकार आहेत असे म्हणतात तर कधी नाही म्हणतात. पण लोकांचा सरकारवर विश्वास आहे. जे डोळे बंद करून फिरतात त्यांना काहीच दिसणार नाही, असा पलटवार ठाकरे यांनी केला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी गंभीर आरोप केले. त्यासंदर्भातही आदित्य ठाकरे यांनी भाष्य केले. ते म्हणाले, संजय राऊत यांच्यासोबत आम्ही आहोत. तिन्ही पक्ष एकमेकांसोबत आहोत, असेही ते म्हणाले.

 

 

दरम्यान, चंद्रपूरमधील (Chandrapur) गोंडकालीन रामाळा तलावाच्या खोलीकरण आणि सौंदर्यीकरणाच्या कामाची पाहणी आदित्य ठाकरे यांनी केली. याशिवाय, ईको प्रो संस्थेच्यावतीने आयोजित केलेल्या गोंडकालीन १२ किलो मीटर लांब किल्ला परकोट ‘हेरिटेज वॉक’च्या बगड खिडकी टप्प्याची पाहणीही केली.

 

Web Title :- Aditya Thackeray | shiv sena aaditya thackeray replied devendra fadnavis criticism over maha vikas aghadi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा