HomeशहरमुंबईAditya Thackeray | '50 थर लावले की थरकाप झालाय हे सर्वांना माहितेय'...

Aditya Thackeray | ’50 थर लावले की थरकाप झालाय हे सर्वांना माहितेय’ – आदित्य ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दीड महिन्यापूर्वी आम्ही 50 थर लावून सर्वात मोठी राजकीय दहीहंडी (Dahi Handi-2022) फोडली आणि सर्वांच्या आशीर्वादाने हे सरकार अस्तित्वात आलं, असं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी टेंभी नाका (Tembhi Naka) येथील दहीहंडी कार्याक्रमात वक्तव्य केलं.
यावर आता आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी जोरदार पलटवार केला आहे.
तुम्ही 50 थर लावले की त्यांचा थरकाप झालाय हे सर्वांना माहित आहे.
किमान आजच्या सणाच्या दिवशी तरी राजकारण नको, असं आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले.
शिवसेना भवन परिसरात शिवसेनेच्यावतीने निष्ठा हंडीचं (Nishtha Handi) आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

 

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले, कुणी किती थर लावले यात मला पडायचं नाही.
50 थर लावले की थरकाप उडालाय हे सर्वांना माहित आहे.
किमान आजच्या दिवशी तरी सणात राजकारण नको. कारण प्रत्येक ठिकाणी राजकारण आणण्याची काही गरज नसते.
24 तास राजकारण करत राहिलं तर सणाचं महत्व तरी काय ? त्यामुळे मला त्यात पडायचं नाही, असे ते म्हणाले.

 

गोविंदा थर लावून दहीहंडी फोडतात मात्र आम्ही 50 थर लावून सर्वात मोठी राजकीय हंडी फोडली असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Chief Uddhav Thackeray) यांना नाव न घेता लगावला.
बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आशीर्वादाने हे शक्य झालं असून असेच थर यापुढे वाढत जातील असा विश्वास देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
यापुढे उत्सव जोरात साजरे करा पण काळजी घेऊन, असेही आवाहन त्यांनी केले.

 

Web Title : –  Aditya Thackeray | shiv sena leader aditya thackeray reply to chief minister eknath shinde remark over maharashtra political development

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News