सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंकडे मागणी केल्यानं महापोर्टल बंद होणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य शासनातर्फे विविध विभागांमार्फत नोकर भरतीच्या परीक्षा महापोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जातात. मात्र या महापोर्टलबाबत खूप तक्रारी दाखल झाल्या आहेत. या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आवाज उठविला असून महापोर्टल बंद करुन चांगले नवीन पोर्टल सुरु करण्याची विनंती नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारं ‘महापोर्टल’ रद्द करण्यासंबंधी विनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे. पोर्टलच्या अयोग्य आणि ठिसूळ कामकाजाच्या बर्‍याच तक्रारी समोर आल्या असून त्याबाबत तोडगा काढणे गरजेचे होते. त्यामुळे आम्ही नवीन पोर्टल सुरु करण्याची मागणी केली आहे.

तसेच शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील या मागणीला पाठिंबा दिला असल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलं. त्याचबरोबर ३ डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिन आहे. त्यामुळे राज्यातील सर्व दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय विभागांतर्गत मंत्रालयात स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात यावा अशी देखील मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे.

यापूर्वीच्या सरकारने शासकीय नोकरभरतीसाठी महापोर्टल सुरु केले होते. परंतु त्याचा कारभार अतिशय अयोग्य रीतीने चालतो. त्यामळे ते बंद करून नव्याने महापोर्टल सुरु करण्यात यावे अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली असून या पोर्टलच्या सेवेत पारदर्शकता अजिबात नाही असे उमेदवारांचे म्हणणे आहे. यामुळे अभ्यास करून जे उमेदवार खऱ्या अर्थाने पास होतात त्यांच्यावर मोठा अन्याय होत असल्याने ते बंद करण्याची विनंती सुप्रिया सुळेंनी केली आहे.

“शासकीय नोकरभरतीसाठी यापुर्वीच्या सरकारने सुरु केलेले महापोर्टल बंद करावे,अशी मागणी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली.या सेवेत पारदर्शकता नाही अशी उमेदवारांची तक्रार असून पात्र उमेदवारांवरही अन्याय होतोय.त्यामुळे ते बंद व्हावे ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.

https://twitter.com/supriya_sule/status/1201067486923280385

“दिव्यांगांसाठी सचिव ते जिल्हास्तरावर सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीत वेगळा विभाग निर्माण करावा आणि महापोर्टल बंद करावे या मागण्यांसाठी @CMOMaharashtra यांच्याकडे वेळ मागितली होती.त्यांनी आम्हाला वेळ देऊन आमचे म्हणणे ऐकून घेतले याबद्दल त्यांचे आभार. धन्यवाद.

मागील काळात महापोर्टल हि सेवा महायुती सरकारने सुरू केली होती. त्याविरोधात अनेक विद्यार्थ्यांच्या तक्रारी देखील आल्या आणि त्या तक्रारी दाखल करण्यात आल्या. त्याचप्रमाणे राज्यभरात ठिकठिकाणी महासेवा पोर्टलविरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलने देखील करण्यात आले. निवडणुकी आधी सुप्रिया सुळे यांनी संवाद यात्रा काढली होती. त्या वेळेस महापोर्टल बंद करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेस आता सत्तेत आली आहे त्यामुळे ते बंद करण्यात त्यांना यश मिळणार आहे.

Visit : Policenama.com