आदित्य ठाकरेंनी बोलाविली शिवसेनेची बैठक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज दुपारी शिवसेनेच्या विधीमंडळ सदस्यांची बैठक बोलाविली असून पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहाणार आहेत.

शिवसेनेच्या आमदारांचा मुक्काम मालाड येथील हॉटेल रीद्रीटमध्ये आहे. शनिवारी रात्री आदित्य ठाकरे यांनी हॉटेलमध्ये जाऊन आमदारांशी चर्चा केली आणि तिथेच मुक्कामही केला. त्याच ठिकाणी साडेबारा वाजता बैठकही होणार आहे.

सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांनी भाजपला आमंत्रित केला आहे. या निमंत्रणानंतर रणनीती ठरविण्यासाठी भाजपची बैठक आजच होत आहे.

Visit : Policenama.com