मनसे सोबत युती करणार का ? ; तरुणीच्या प्रश्नाला आदित्य ठाकरेंचे ‘ठाकरे शैली’त उत्तर

मुंई : पोलीसनामा ऑनलाइन – जे सतत भूमिका बदलत असतात त्यांच्या सोबत आपण जात नाही. असे वक्तव्य युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले आहे. मुंबईत आयोजित ‘आदित्यसंवाद’ कार्यक्रमात मनसेसोबत युती करणार का ? ‬या विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना त्यांनी हे वक्तव्य केले.

मुंबईतील NSUI मध्ये आदित्यसंवाद हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी राजकीय, शिक्षण, सामाजिक, अशा अनेक विषयांवर त्यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी एका तरुणीने आपण भाजपा सोबत युती केली, भविष्यकाळात राज ठाकरे यांच्या मनसेसोबत युती करणार का ? असा प्रश्न विचारला. दरम्यान, शिवसेनेची आणि भाजपाची भूमिका वर्षानुवर्ष कायम आहे. जे विरोधात आहेत, सतत भूमिका बदलतात त्यांच्या सोबत आपण गेलेलो नाही. असे उत्तर आदित्य ठाकरे यांनी दिले. विशेष म्हणजे आदित्य ठाकरे यांनी या प्रश्नाला ठाकरे शैलीत उत्तर देत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.

याचबरोबर, अनेक प्रश्न त्यांना विचारण्यात आले. आदित्य ठाकरेंनीही सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. मुंबईतील या कार्यक्रमाला तरुणांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला, यानंतर अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्या मावळ मतदार संघात आदित्यसंवाद हा कार्यक्रम होणार आहे. तसेच महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.