Aditya Thackeray | मास्कमुक्त महाराष्ट्र नाहीच; आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण

नाशिक:  पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा (Corona Third Wave) प्रभाव आता हळूहळू कमी होऊ लागला आहे. तर दुसरीकडे राज्यात लसीकरण मोहीम (Vaccination Campaign) मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे. दरम्यान, जगातील काही देशांनी मास्क मुक्त देश (Mask Free Country) म्हणून जाहीर केले आहे. त्या पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (State Cabinet Meeting) राज्य मास्कमुक्त करण्याच्या संदर्भात चर्चा झाली. त्यामुळे सर्वत्र महाराष्ट्र मास्कमुक्त (Maharashtra Mask Free) होणार अशी चर्चा सुरु झाली आहे. मात्र, या चर्चेसंदर्भात राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे. नाशिक येथील पत्रकार परिषदेत त्यांनी (Aditya Thackeray) मास्कमुक्त महाराष्ट्र तूर्त तरी शक्य नसल्याचे म्हंटले आहे.

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray ) म्हणाले की, मास्कसक्ती काढली जाईल हा गैरसमज पहिल्यांदा दूर केला पाहिजे. कोरोना संकटात (Corona Crisis) जे काही निर्णय घेतले आहेत ते सर्व निर्णय डॉक्टर आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच घेतले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) सुद्धा कोरोनाचे संकट संपल्याचे जाहीर केलं नाही. ओमायक्रॉन (Omicron) किंवा कुठलाही व्हेरिएंट हा वीक किंवा स्ट्राँग आहे, व्हेरिएंट हा व्हेरिएंट असतो. त्यामुळे आपला जीव वाचवायचा असेल तर मास्क महत्त्वाचा आहे, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता राज्यातील मास्कसक्ती तूर्त तरी हटणार नाही हे निश्चित झाले आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा

महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi Government) मंत्रिमंडळाची २७ जुनेवारीला बैठक पार पडली. त्यामध्ये मास्क (Mask) संदर्भात चर्चा झाली. जगातील युरोप, इंग्लंड आणि फ्रान्ससह अनेक देशांनी मास्क न वापरण्या संदर्भात भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे आपण अशी भूमिका घेणार का ? अशी चर्चा मंत्रिमंडळात झाली. मास्क वापरण्यासंदर्भात टास्क फोर्सबाबत (Task Force) चर्चा केल्यानंतरच मास्क बाबतीत धोरण होणार असल्याचे समजते. कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण कमी झाले असले तरी चौथी लाट (Corona Fourth Wave) येण्याची शक्यता आहे. त्याचा अभ्यास करूनच राज्य सरकार (State Government) निर्णय घेणार असल्याचं बोललं जात होतं.

Web Title :  Aditya Thackeray | will maharashtra mask free state soon on this question minister aaditya thackeray gives answer

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Sugar Range | मुले, प्रौढ आणि ज्येष्ठांची किती असावी ब्लड शुगर, पहा संपूर्ण चार्ट

 

Pune Police | पुणे पोलीस शहर दलातील 4 ‘अति’ वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘कोरोना’ची लक्षणे,
पदभार इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे

 

Omicron | ओमिक्रॉनच्या ‘या’ 4 लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, होऊ शकते मोठी समस्या

 

TET Exam Scam | खळबळजनक ! राज्यात 7880 बोगस शिक्षक, 7880 अपात्र परीक्षार्थींना गुण वाढवून केले पात्र; पुणे पोलिसांच्या तपासात खळबळजनक खुलासा (व्हिडीओ)

Ankita Lokhande Bold Scene | अंकिता लोखंडेनं लग्नानंतर घेतला ‘हा’ मोठा निर्णय ! म्हणाली – ‘नो टू..’

Bank Holidays in Feb 2022 | फेब्रुवारी महिन्यात 12 दिवस बंद राहतील बँका, ब्रँचमध्ये जाण्यापूर्वी आवश्य पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Bhaiyyu Maharaj Suicide Case | भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी शरद देशमुख, विनायक दुधाळे आणि पलक पुराणिक दोषी; जाणून घ्या प्रत्येकाचा ‘रोल’