‘मातोश्री’बाहेर आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्रिपदाचे बॅनर, राजकीय घडामोडींना वेग ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच आपला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता मातोश्री बाहेर आदित्य ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपदाचे बॅनर झळकताना दिसत आहेत. काही मिनिटांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर हल्लाबोल करत तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती असे म्हटले होते. आमच्यावर खोटारडे असल्याचे आरोप करण्यात आले. मला खोटारडे ठरवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि आता आम्ही त्यांच्याशी बोलण्यास तयार नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यानंतर आज मातोश्रीबाहेर आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाचे बॅनर पाहायला मिळाले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवा असा स्वर आहे.

राज्यात अभुतपूर्व परिस्थिती निर्माण झाली असताना मातोश्री बाहेर शिवसैनिकांनी लावलेल्या बॅनरमुळे अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत. तर तिकडे शरद पवारांची काँग्रेस नेते भेट घेत आहेत आणि दरम्यान संजय राऊत देखील शरद पवारांच्या निवास्थानी निघाले आहेत. त्यामुळे राजकीय भूकंप येणार अशी शक्यता आहे. एकीकडे भाजप सेनेचे बिनसलं असताना या घडामोडी महत्वाच्या आहेत. यामुळे भाजपला धक्का बसण्याची शक्यता मानली जात आहे. ही भेट शिवसेनेला पाठिंबा देण्यासंबंधित निर्णयावर सुरु असल्याचे सांगितले जात आहे.

मुख्यमंत्रिपदांचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्रीवर पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की महायुतीसाठी आमची दारे अजूनही खुली आहेत. महायुतीत निवडून आलो, महायुतीसाठी दार बंद नाहीत. यावेळी युती तुटली नाही असे देखील फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. परंतू आता मातोश्रीबाहेर आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्रिपदाचे बॅनर लागल्याने काय होणार हे अजून स्पष्ट नाही.

Visit : Policenama.com 

 

You might also like