आदित्य ठाकरे आणि दिशा पटानी एकत्र ; नेमक काय चाललय ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री दिशा पटानी मुंबईतील बांद्रा परिसरात स्‍पॉट झाली आहे. विशेष म्‍हणजे, ती यावेळी टायगर श्रॉफसोबत नव्‍हती. तिच्यासोबत युवासेना अध्यक्ष आदित्‍य ठाकरेसोबत कॅमेराबध्‍द झाली. त्यामुळे बॉलिवूडमध्येच नाहीतर राजकारणातही यावर चर्चा सुरु झाल्या आहेत. हे दोघे एकत्र कसे असे प्रश्न समोर येत आहेत.

आदित्‍य ठाकरे आणि अभिनेत्री दिशा लंचसाठी आले होते. तेव्हा आदित्यने स्‍वत: गाडी चालवली आणि दिशा गाडीमध्‍ये आदित्‍यच्‍या शेजारी बसलेली दिसली. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर दिसत आहेत. त्यामुळे तर्क वितर्कांना उधाण आले आहे.

आकाश अंबानी आणि श्‍लोका मेहता यांचे लग्न नुकतेच पार पडले. या लग्‍नात आदित्य ठाकरे यांनी आपल्या वडिलांसोबत उपस्‍थिती लावली. तर दिशा पटानी तिचा बॉयफ्रेंड, अभिनेता टायगर श्रॉफसोबत आली होती.

आदित्‍य-दिशा दोघे चांगले मित्र आहेत. एका कामासाठी ते एकत्र बाहेर निघाले होते, अशी माहिती समोर आली आहे. दिशा पटानी आणि आदित्‍य ठाकरे रविवारी लंचला गेले होते. आदित्‍य-दिशा एकत्र दिसल्‍याने सर्वांच्‍या नजरा त्‍यांच्‍याकडे वळल्‍या. आश्चर्य असे की नेहमी टायगरसोबत दिसणारी दिशा यावेळी आदित्‍यसोबत दिसली.

दरम्यान, टायगर दिशाला वेगवेगळ्‍या डिशेसची चव चाखायला आवडते. प्रत्‍येक रविवारी जेवण्‍यासाठी टायगर आणि दिशा बाहेर जातात, असा खुलासा टायगरने कॉफी विथ करणमध्‍ये केला होता.