सर्वात जास्त राग कोणाचा येतो, राज ठाकरे की नारायण राणे ? आदित्य ठाकरेंचं ‘सावध’ उत्तर

संगमनेर : पोलीसनामा ऑनलाइन – संगमनेरमध्ये अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने शुक्रवारी आयोजित केलेल्या मेधा – 2020 युवा सांस्कृतिक महोत्सवात संवाद तरुणाईशी या कार्यक्रमात नव्याने निवडून आलेल्या तरुण आमदारांसह सुसंवाद साधण्यात आला. यावेळी मंत्री आदित्य ठाकरे, रोहित पवार, आदिती तटकरे, ऋतुराज पाटील, झिशान सिद्दीकी, धीरज देशमुख यांचा समावेश होता. तर मुलाखतकार अभिनेते अवधूत गुप्ते होते. यावेळी मुलाखतकार अवधूत गुप्ते आदित्य साहेब म्हणाले परंतु यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की प्रोटोकॉल लागू असला तरी मला आदित्य साहेब म्हणू नका, मला आदित्यच म्हणत जा.

आदित्य ठाकरे म्हणाले की, आम्ही तरुण आमदार एकत्र येऊन महाराष्ट्रासाठी काही तरी करु इच्छितो. ज्या ज्या मिनिटाला जे गरजेचे असते, ते केलं पाहिजे. टेन्शन बाजूला सोडून मजा करणे गरजेचे आहे. मी अनेक फेस्टिव्हल पाहिले, पण हा फेस्टावल थोडा वेगळा आहे. युवा पिढी मनातले प्रश्न विचारलाय लागली आहे. आधी मंत्री, नेते समोर असल्यावर तरुणांवर थोडं दडपण असायचे. शपथविधीसाठी आईचे नाव घेणे हा माझ्यासाठी मोठा क्षण होता.

यावेळी रॅपिड फायर प्रश्नोत्तरात प्रश्न विचारण्यात आला की बायको आईच्या पसंतीची करणार की स्वताच्या पसंतीची. यावर बोलताना मला पहिले काम करायचं असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच कोणाचे व्यक्तीमत्व आवडते, देवेंद्र फडणवीस की अजित पवार या प्रश्नावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की मला अजित पवारांचे व्यक्तीमत्व आवडते.

कोणाचा आधिक राग येतो राज ठाकरे की नारायण राणे ? या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माझे वडील यांना देखील असे प्रश्न अनेकदा विचारले जातात. यावर सर्वांना मी माफ केलं असं उत्तर उद्धव ठाकरेंकडून येते. परंतु मी माफ करण्याइतका मोठा नाही, परंतु राजकारणात राग वैगरे धरायचा नसतो, कोणीही कसंही राहू दे आपण मात्र स्वच्छ मनाने राहायचे पाहिजे आणि वागले पाहिजे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/