आमच्या खाऊच्या पैशातून- कोरी पाने…उज्ज्वल भविष्याची 

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन

शिक्षणाची ओढ असलेल्या आपल्या मैत्रिणींना वह्यांची भेट देण्यासाठी सरसावलेल्या पुण्यातील रेणुका स्वरुप मुलींच्या प्रशालेतील विद्यार्थीनींनी मुळशी तालुक्यातील तब्बल ७०० विद्यार्थ्यांना आपल्या खाऊच्या पैशातून तब्बल ३ हजार वह्यांच्या मदतीसोबत मैत्रीचा हात दिला. पौड परिसरातील तब्बल १८ शाळांतील विद्यार्थ्यांना वहयांच्या माध्यमातून ही कोरी पाने देऊन त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी बळ देण्याचा प्रयत्न पुण्यातून केला गेला आहे.
[amazon_link asins=’B01DN8TB5U’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cfd86f1b-9412-11e8-9779-dffb6d65e8b7′]
निनाद, पुणे आणि निनाद नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे रेणुका स्वरुप मुलींची प्रशालेच्या सहकार्याने ७०० आदिवासी-कातकरी विद्यार्थ्यांना आमच्या खाऊच्या पैशातून – कोरी पाने…उज्ज्वल भविष्याची या अभियानांतर्गत पुण्यातील शालेय विद्यार्थ्यांकडून वह्यांची अनोखी भेट देण्याचा कार्यक्रम प्रशालेच्या सभागृहात पार पडला. यावेळी महापौर मुक्ता टिळक, संस्थेच्या मानसी भाटे, मुख्याध्यापिका जयश्री शिंदे, पर्यवेक्षिका विजयमाला घुमे, पुष्पलता लाड, पुष्पलता मोरे, निनाद संस्थेच्या शुभदा जोशी, उदय जोशी, रामलिंग शिवणगे, मयुरेश जोशी, पुरुषोत्तम वाईकर, प्रकाश चोभे, अनुप जोशी, भारत भूमकर, सचिन देसाई आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला आदिवासी-कातकरी पाड्यांवरील २० विद्यार्थीनी मुळशी येथून पुण्यामध्ये आल्या होत्या.

मुक्ता टिळक म्हणाल्या, कोणतेही सामाजिक काम करताना त्यामागे दृष्टीकोन काय आहे, हे महत्त्वाचे असते. समाजातील लोकांना सोबत घेऊन काम केल्यास त्याला वेगळा अर्थ निर्माण होतो. चिखल, डोंगरद-या आणि गळके छत असलेल्या वर्गांमध्ये शिक्षण घेणा-या आदिवासी-कातकरी विद्यार्थ्यांना आपण सलाम केला पाहिजे. मुलींच्या शिक्षणासाठी गेली १५० ते २०० वर्षे आपण लढा देत आहोत. परंतु आज २१ व्या शतकातही आपण ते ध्येय पूर्णपणे गाठू शकलो नाही. केवळ शैक्षणिक नाही, तर व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करायला हवे.
[amazon_link asins=’8184511213′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’df3a6b7b-9412-11e8-b97c-e160621d3431′]
उदय जोशी म्हणाले, आदिवासी कातकरी विद्यार्थ्यांकरीता निनाद कन्या शिक्षण संवर्धन योजनेच्या माध्यमातून काम सुरु झाले आहे. केवळ शैक्षणिक विकास नाही, तर त्यांच्या सर्वांगिण विकासाकरीता पुणेकरांच्या मदतीने प्रयत्न सुरु आहेत. मुळशी तालुक्यातील तब्बल १८ शाळांमध्ये हा उपक्रम सुरु असून क्रीडा, सांस्कृतिक व कला क्षेत्रात देखील या विद्यार्थ्यांनी पुढे यावे, यासाठी काम सुरु केले आहे, असेही त्यांनी सांगितले. मानसी भाटे, जयश्री शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.  वर्षा धर्माधिकारी यांनी सूत्रसंचालन केले.