पुणे : हॉटेल मालकाला धडा शिकवण्यासाठी व्यवस्थापकानेच केली चोरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुण्यातील खराडी परिसरात असलेल्या दम बिर्याणी हॉटेलमधून टीव्ही आणि दोन गॅस सिलेंडर चोरीला गेल्याची घटना घडली होती. या चोरीच्या घटनेमागे सराईत चोर किंवा भुरटा चोर नसून हॉटेलमध्ये काम करणाऱ्या व्यवस्थापकानेच ही चोरी केल्याचे तपासत समोर आले आहे. हॉटेल मालकासोबत पैशावरुन झालेल्या वादातून त्याने हॉटेल मालकाला धडा शिकवण्यासाठी हे कृत्य केले. ही चोरी करण्यासाठी त्याने इतर दोन साथिदारांची मदत घेतली. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[amazon_link asins=’B01N4J3WAE,B0734VLDTC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7285cbf1-b5b1-11e8-ba4c-09fc0e12c98a’]

याप्रकरणी महादेव रघुनाथ मोरे याला अटक केली आहे. तर हॉटेल मौर्य दम बिर्याणीचे मालक शंकर मोरे यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल मालक आणि आरोपी दोघेही अहमदनगर जिल्ह्यातील एकाच गावचे रहिवाशी आहेत. त्यामुळे हॉटेल मालक मोरे यांनी आरोपीला त्यांच्या हॉटेलमध्ये व्यवस्थापक म्हणून कामावर ठेवले होते. आरोपी महादेव मोरे याचे त्याच्या गावातील एका मुलीवर प्रेम होते. या मुलीला गावातून पळवून नेऊन त्याने तिच्याशी लग्न केले. लग्न केल्यानंतर ते पुण्यामध्ये भाड्याच्या घरामध्ये राहत होते. संसार चालवण्यासाठी त्याला पैशांची गरज भासू लागल्यान त्याने हॉटेल मालकाकडे पैशांची मागणी करुन पैसे घेत होता. याच पैशांच्या वादातून आरोपीने हॉटेल मालकाला धडा शिकवण्यासाठी हॉटेलमधील टीव्ही, दोन गॅस सिलेंडर असा एकूण १३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला.
[amazon_link asins=’B01LZPUP1O,B0765ZZRX1′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’79dbd99b-b5b1-11e8-a263-49724bc43ccc’]

हॉटेलमध्ये चोरी झाल्याची तक्रार चंदननगर पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. चंदननगर पोलिसांनी संशयावरुन आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशी दरम्यान हा सर्व प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी आरोपी महादेव मोरेला अटक केली असून, या प्रकरणात त्याला साथ देणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास चंदननगर पोलीस करीत आहेत.

पोलीसनामा न्युज
ब्रेकिंग न्यूज तसेच राज्यातील आणि देशविदेशातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पोलिसनामाच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन व्हा… आणि मिळवा पोलीसनामा च्या प्रत्येक बातमीची लिंक