माणुसकी ! लासलगावमधील संस्थानी सर्व सामान्यांसाठी केले 20 ऑक्सिजन मेक मशीनचे ‘लोकअपर्ण’

लासलगाव – कोविडचा प्रादुर्भाव वाढल्याने तसेच रुग्णालयात ऑक्सिजन बेड मिळत नसल्याने रुग्णांसाठी ऑक्सिजन उपलब्ध व्हावा म्हणून संतोष पलोड मित्र मंडळ,लासलगाव मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक, यशश्री ग्रामीण पतसंस्था आणि लासलगाव ग्रामीण पतसंस्था यांच्या संयुक्त वतीने गरजू लोकांसाठी २० ऑक्सिजन मेक मशिन उपलब्ध करून दिले. लासलगाव सह निफाड तालुक्यात कोरोना रुग्णांचा वेग वाढला आहे . कोरोना संसर्गाने ग्रामीण भागालाही विळखा घातलेला आहे . लासलगाव व परिसरातील रुग्णसंख्या वाढत आहे . राज्यासह ग्रामीण भागामध्ये कोरोना संसर्गात झाला झाल्याने रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होत आहे या पार्श्वभूमीवर परिसरातील गरजू रुग्णांना ऑक्सिजनची गरज भागविण्यासाठी येथील संस्थांनी उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून परिसरातील गरजूंना विनामूल्य ऑक्सीजन मेकर मशीन व ऑक्सी मिटर सेवा उपलब्ध होणार आहे .

लासलगावातील सध्याची परिस्थिती पाहता कोरोनाच्या विळख्याने सर्वत्र वेढले आहोत. लासलगावात डॉक्टर व समाजातील इतर घटक आपल्या पध्दतीने सर्वतोपरी मदत करताना दिसतात.मात्र ऑक्सिजन सिलेंडरचा सर्वत्र तुटवडा आहे. हेच लक्षात येतात लासलगाव मधील संस्थानी एकत्र येत

ऑक्सीजन मेकर मशीन उपलब्ध केल्याने नागरिकांना याचा फायदा होणार आहे.

यावेळी माजी आमदार कल्याणराव पाटील ,

नामको चे संचालक प्रकाश दायमा,

ग्रामपंचायत सदस्य संतोष पलोड, राजू राणा,ज्ञानेश्वर पाटील,राजेंद्र घोलप, बाळासाहेब टापसे, डॉ पुष्पक पलोड,सुदर्शन पलोड,लामकोचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजाराम रसाळ, लासलगाव ग्रामीण पतसंस्थेचे व्यवस्थापक किशोर केदार,अतुल उगले,संतोष तोतला आदी उपस्थित होते

(माजी कल्याणराव पाटील)
लासलगाव परिसरातील कोरोना रुग्णांना आवश्यक असलेला ऑक्सिजन ची गरज भागवण्यासाठी आम्ही लासलगाव करांनी विविध संस्थेच्या माध्यमातून सदर ऑक्सि मेकर मशीन उपलब्ध करून दिले आहे. या माध्यमातून परिसरातील गरजू रुग्णांना याचा फायदा होणार आहे. सदर मशीन रुग्णांना विनामूल्य देण्यात येणार आहे तरी रुग्णांनी याचा फायदा घ्यावा.