पाकिस्तानचे ‘हिरो’ राहिलेले आहेत अदनान सामीचे वडिल, 1965 च्या युध्दात भारतावर केला होता बॉम्बचा ‘वर्षाव’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत सरकारने गायक अदनान सामीला पद्मश्री देऊन सन्मानित केले. यानंतर वाद उफाळून आला. ज्या व्यक्तीचे वडील भारताच्या विरोधात युद्धात लढले, त्याच्या मुलाचा सन्मान कसा केला जाऊ शकतो. अदनान सामीचे वडील अरशद सामी खान पाकिस्तानी एअरफोर्सकडून 1965 च्या युद्धात भारताच्या विरोधात लढले होते.

अदनान सामीचे वडील अरशद सामी खान 8 फेब्रुवारी 1942 ला अफगाणिस्तामध्ये जन्मले होते. अदनानचे आजोबा अरशद यांचे वडील अब्दुल सामी खान डिप्टी जनरल ऑफ पोलीस होते. तेव्हा भारत आणि पाकिस्तानचे विभाजन झालेले नव्हते.

अफगाणिस्तानात साक्का हबीबुल्ला ककानी क्रांतिच्या वेळी अरशद सामी खानचे आजोबा मेहफूज जनला मारले होते. यानंतर अरशद सामी खान यांचे कुटूंब अफगाणिस्तानातून पळून पाकिस्तानच्या पेशावरला येऊन राहण्यास लागले. कुटूंबांतील परंपरा पाहून अदनानचे वडील अरशद सामी खान यांनी देखील पाकिस्ताची वायुसेनामध्ये सहभागी झाले. अरशद सामी तेव्हा नॅशनल हिरो झाले जेव्हा त्यांना पाकिस्तान सरकारने सितारा-ए-जुर्रत पुरस्कार देण्यात आला. हा पाकिस्तानी सैन्यातील तिसरा सर्वात मोठा शौर्य पुरस्कार मानला जातो.

अरशद सामी खान पाकिस्तानचे राष्ट्रपती अयूब खान, याह्या खान आणि जुल्फिकार अली भूट्टोचे एडीसी देखील होते. अरशद अनेक देशात पाकिस्तानचे राजदूत म्हणून कार्यरत होते. 1989 मध्ये त्यांना पॅंक्रियाटिक कॅंसरची माहिती मिळाली. त्यांच्यावर लंडनच्या क्रोमवेल रुग्णालयात उपचार सुरु होते. यानंतर 20 वर्षांनी त्यांचे निधन मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात 22 जून 2009 साली झाले.

1965 साली झालेल्या भारत पाक युद्धात अरशद सामी खान पाकिस्तानी एअरफोर्समध्ये फ्लाइट लेफ्टिनेंट होते. पाकिस्तानी एअरफोर्स म्यूझिअमच्या वेबसाइटवर दिलेल्या माहिती नुसार अरशद सामी खान यांनी या युद्धात 1 लढाऊ विमान, 15 टॅंक आणि 22 सैन्याच्या गाड्या उध्वस्त केल्या होत्या. या शौर्यासाठी पाकिस्तानी सरकारने त्यांना सितारा-ए-जुर्रत पुरस्काराने गौरवले होते.

फेसबुक पेज लाईक करा