तुम्ही भारतीय पदार्थ रोज खाता, पाकिस्तानी युझरला अदनान सामीची ‘कोपरखळी’

पोलीसनामा ऑनलाइन – प्रसिद्ध गायक अदनान सामी यांनी सोशल मीडियावर आवडत्या पदार्थाचा फोटो ट्विट केला होता. या पदार्थावरुन एका पाकिस्तानी नेटकर्‍याने अदनानला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र चकित करणारे उत्तर देऊन सामीने पाकिस्तानी युझरचे तोंड बंद केले आहे.

अदनानने निहारी खाद्यपदार्थाचा फोटो ट्विट केला होता. हा अदनानचा आवडता पदार्थ आहे. या फोटोवर एका पाकिस्तानी युझरने कॉमेंट केली. पाकिस्तानचे राष्ट्रीय पदार्थ खाण्यासाठी धन्यवाद असे म्हणत त्याने अदनानला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र अदनानने देखील चतुराईचे दर्शन घडवित त्याला अद्दल घडविली आहे.

या पदार्थाचा शोध सर्वप्रथम लखनऊ येथे लागला होता. व्वा ही तर कमाल झाली, एक भारतीय पदार्थ पाकिस्तानचे राष्ट्रीय खाद्य आहे. हे अगदी उर्दू भाषेसारखेच झाले. अशा आशयाचे ट्विट करुन अदनानने त्या पाकिस्तानी नेटकर्‍याचे तोंड बंद केले अदनान सामीचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अनेकांनी त्याच्या चतुराईचे कौतुक केले आहे.