किशोर कुमार यांची भूमिका साकारणार अदनान सामी ?

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – किशोरकुमार यांनी गायलेल्या गाण्यांनी अनेक पिढ्यांना मंत्रमुग्ध केलं. आता किशोर कुमार यांच्यावर आधारित बायोपिक येणार आहे. विशेष म्हणजे या बायोपिकमध्ये किशोर कुमार यांची भूमिका गायक अदनान सामी साकारणार असल्याची चर्चा आहे. अदनान सामीनं अलीकडेच एका रिआलिटी शोमध्ये किशोर कुमार यांची गाणी रिक्रिएट केली. अदनानला गाताना ऐकून अनेकांना किशोर कुमार यांची आठवण आली असून त्याचं मोठं कौतुकही करण्यात आलं.

किशोर कुमार यांच्या बायोपिकमध्ये भूमिका साकारण्यासाठी अदनान सामीशी संपर्क साधण्यात आला अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अदनान स्वत: उत्तम गायक, संगीतकार आणि अभिनेता आहे. त्यामुळे किशोर कुमार यांचे व्यक्तिमत्त्व तो उत्तमरित्या साकारू शकेल असा विश्वास चित्रपटाच्या टीमला वाटत आहे. अदनान या चित्रपटात काही गाणीही गाणार असल्याची माहिती मिळते आहे.