Adobe चे सह संस्थापक आणि जगाला PDF चं गिफ्ट देणारे चार्ल्स गेश्की यांचं 81 व्या वर्षी निधन

लॉस आल्टोस : वृत्त संस्था  – सॉफ्टवेअर निर्माता कंपनी Adobe चे सह संस्थापक आणि पोर्टेबल डॉक्यूमेंट फॉर्मट (PDF) टेक्नीकचा विकास करणारे चार्ल्स ‘चक’ गेश्की यांचं निधन झाले आहे. ते 81 वर्षाचे होते. Adobe कंपनी नुसार त्यांचं शुक्रवारी निधन झालं. ते सॅन फ्रान्सिस्कोच्या बे एरियामधील लॉस आल्टोस या उपनगरामध्ये रहावयास होते.

Adobe कंपनीचे सीईओ शांतनु नारायण यांनी कंपनीच्या कर्मचार्‍यांना एक ई-मेल लिहीला असून त्यामध्ये त्यांनी गेश्की यांच्या निधनामुळं Adobe समुह आणि प्रौद्योगिक जगाची मोठी हानी झाल्याचं म्हंटलं आहे.