चांगल्या गोष्टी आत्मसात करा : पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – विद्यार्थी उज्ज्वल भारताचे नागरिक आहेत. विद्यार्थीदशेतच मुलांचा सर्वांगिण विकास होणे गरजेचे आहे. चांगल्या गोष्टी आत्मसात करा, असे आवाहन पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी केले.

विद्यार्थ्यांना कायदा आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीची माहिती देण्यासाठी केंद्र शासनाने स्टुडंट पोलिस कॅंडेट (एसपीसी) उपक्रम सुरू केला आहे. सांगली जिल्हा पोलिस दलातर्फे शुक्रवारी सुकाणू समिती स्थापन करण्यात आली. यावेळी अधीक्षक शर्मा यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

एसपीसी कार्यक्रम आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. यात उत्तम नागरिक होण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. कायद्याचे किमान ज्ञान आणि कायद्याचे स्वेच्छेने पालन, इतरांबद्दल जबाबदारीची जाणीव असावी, त्याने दुर्बल घटकांबद्दल दयाभाव बाळगावा या उद्देशाने हा कार्यक्रम राबविला जाणार आहे.
यावेळी अतिरिक्त अधीक्षक शशिकांत बोराटे, उपाधीक्षक अकुंश इंगळे, उपनिरीक्षक मनोज बाबर, प्रवीण शिंदे, किशोर मेथे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

मराठा आरक्षण झाले आता धनगर व मुस्लिम समाजाला आरक्षण हेच ध्येय : सुनिता गडा

पहलू खान लिंचिंग प्रकरण : कॉंग्रेस आता भाजपची कॉपी बनले आहे : ओवेसी

मागास वर्गीय विद्यार्थ्यांचा भोजन व निवासाचा खर्च शासन उचलणार

लहान मुलांच्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

कोवळे ‘पिंपळपान’ हृदयातील ब्लॉकेजेसाठी वरदान