New Union Cabinet | 42 % मंत्र्यांविरोधात गुन्हे दाखल, 90 % मंत्री करोडपती; ADR चा अहवाल सादर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – New Union Cabinet | केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये नुकताच फेरबदल करुन बुधवारी विस्तार (Cabinet Expansion) करण्यात आला. 43 नवीन मंत्र्यांनी केंद्रीय मंत्रिपदाची (New Union Cabinet) शपथ घेतली आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्र्यांची एकूण संख्या 78 एवढी झाली आहे. परंतु यापैकी तब्बल 42 टक्के म्हणजे 33 मत्र्यांविरोधात गुन्हे (FIR) दाखल असून यातील 24 जणांविरोधात हत्या, हत्येचा प्रयत्न, दरोडा यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. ADR अर्थात Association For Democratic Reforms ने नुकताच याबाबतचा अहवाल (Cabinet Minister Criminal Report) सादर केला आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नव्या मंत्रिमंडळासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिली माहिती

ADR कडून अशा प्रकारे अभ्यास अहवाल प्रकाशित केले जातात. एडीआरच्या ताज्या अहवालानुसार, एकूण 78 केंद्रीय मंत्र्यांपैकी 33 मंत्र्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत. याशिवाय 24 मंत्र्या विरोधात हत्या , हत्येचा प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या सर्वांनी निवडणुकीच्या वेळी सादर केलेल्या प्रतिज्ञपत्रामध्ये दिलेल्या माहितीवरून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

गृह राज्यमंत्र्यावरच हत्येचा गुन्हा

मंत्रिमंडळात सर्वात तरुण मंत्री ठरलेले 35 वर्षीय निसित प्रामाणिक यांच्याकडे केंद्रीय गृहराज्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. परंतु त्यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा (भादंवी 302) दाखल असल्याचे एडीआरच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय जॉन बारला, पंकज चौधरी आणि व्ही मुरलीधरन या तिघांविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा (भादंवी 307) गुन्हा दाखल आहे.

90 टक्के मंत्री करोडपती

एडीआरच्या अहवालात केलेल्या दाव्यानुसार 78 मंत्र्यांपैकी 70 मंत्री म्हणजे 90 टक्के मंत्री हे करोडपती आहेत. या मंत्र्यांची सरासरी संपत्ती 16.24 कोटी रुपये एवढी आहे. केंद्रातल्या एकूण 4 मंत्र्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात 50 कोटींहून अधिक संपत्ती असल्याचे जाहीर केले आहे. यामध्ये ज्योतिरादित्य शिंदे, पियुष गोयल, नारायण राणे आणि राजीव चंद्रशेखर यांचा समावेश आहे.

8 मंत्री लखपती

78 केंद्रीय मंत्र्यांपैकी 8 मंत्र्यांची संपत्ती 1 कोटीपेक्षा कमी असल्याचे अहवालात म्हटलं आहे. सामाजिक न्याय राज्यमंत्री प्रतिक्षा भौमिक यांच्यानावे केवळ 6 लाखांची संपत्ती आहे. जॉन बारला यांच्या नावे 14 लाख तर कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांच्यानावे 24 लाखांची संपत्ती आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळात 9 डॉक्टर

एडीआरच्या अहवालानुसार, केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये एकूण 82 टक्के म्हणजे 64 मंत्री हे सुशक्षित आहेत. त्यांचे शिक्षण पदवी किंवा त्यापेक्षा जास्त झाल आहे. तसेच 15 टक्के म्हणजे 12 मंत्री हे 8 वी ते 12 दरम्यान शिक्षण घेतलेले आहेत. 2 मंत्र्यांनी डिप्लोमा केला आहे. तर 17 मंत्री पदवी, 21 पदव्युत्तर आणि 9 मंत्री डॉक्टरचं शिक्षण पूर्ण केलेले आहेत.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://groups.google.com/g/national-election-watch/c/xsuIVXtbStA?hl=en

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Web Title : adr report on central cabinet minister criminal cases attempt to murder in election affidavit

हे देखील वाचा

Anti Corruption Trap | साडे सात लाख रुपयांच्या लाच प्रकरणी पोलीस निरीक्षकासह
2 अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात; राज्य पोलीस दलात खळबळ

पोलीस निरीक्षक संपत पवार यांची या पूर्वी पुण्यातील गुन्हे शाखेत आणि
दत्तवाडी पोलीस ठाण्यात नोकरी झाली आहे

Pune Navale Bridge Accident | पुण्यातील नवले पुलावर पुन्हा मोठा अपघात;
ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने 8 वाहनांचे नुकसान