25 वर्षांची ‘ही’ पॉर्नस्टार इंस्टाग्रामवर बॅन, CEO वर टाकलेल्या एका पोस्टमुळे उडाली खळबळ
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेची पोर्नस्टार केंड्रा संदरलँडला इन्स्टाग्रामने बॅन केले आहे. संदरलँडने नशेत लिहिले की, सोशल मीडियाच्या धोरणात्मक नियमांच्या विरुद्ध असलेली कोणतीही पोस्ट ती पोस्ट करू शकते. तिने असाही दावा केला की, तिच्याकडे हा विशेषाधिकार आहे, कारण इन्स्टाग्रामचे मुख्य कार्यकारी अधिकारी अॅडम मोसेरी यांच्याशी तिचे प्रेमसंबंध आहे. 25 वर्षांच्या संदरलँडने इन्स्टाग्रामच्या सीईओशी असलेल्या अफेअरविषयी एक टॉपलेस फोटो अपलोड केल्यानंतर सांगितले होते. जो सोशल प्लॅटफॉर्मवर कित्येक आठवड्यांपासून होता. हा फोटो अपलोड केल्यानंतर लवकरच अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले, ‘नमस्कार मित्रांनो! मला सांगायचे आहे की माझे खाते अद्याप डिलीट केले गेले नाही.
संदरलँडचे अकाउंट ब्लॉक केल्यानंतर इंस्टाग्रामने दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटले की, पोर्नस्टारचा मोसरे किंवा कंपनीच्या कोणत्याही कर्मचाऱ्याशी संबंध नाही. त्यांनी संडरलेडचा कंटेंट फ्लॅग करण्याच्या किंवा त्यांना विशेष प्राधान्य देण्याचे वापरकर्त्यांचे दावे देखील नाकारले
तिच्या एका मुलाखतीत, संदरलँड म्हणाली की, तिने जेव्हा हे पोस्ट केले त्यावेळी ती अत्यंत नशेत होती. तिने आपल्या ट्विटर हँडलवर लिहिले की, ‘आम्हा सर्वांना सोशल मीडियावर समान स्वातंत्र्य हवे आहे आणि आम्हा सर्वांची इच्छा आहे की, सेक्स वर्कर्सशी होणारा भेदभाव थांबला पाहिजे. परंतु मी आशा करते की, माझे खाते बंद झाले आहे हे कळल्यावर आपण आनंदी किंवा समाधानी आहात.’ संदरलँडने पुढे लिहिले की, ‘मुर्खासारखा कंटेंट पोस्ट केल्यामुळे मला टिकटॉकवर नेहमीच बॅन केले जाते. हे सर्व अॅप्स सेक्स वर्कर्सला थेट लक्ष्य करतात आणि मी त्यांच्यापेक्षा वेगळी देखील नाही. दरम्यान, मी माझा लढा सुरूच ठेवणार आहे. माझ्यासाठी आणि आपल्यासारख्या सर्व सेक्स वर्कर्ससाठी.
यापूर्वी, इंस्टाग्रामने म्हटले होते की, संदरलँडता कंटेंट चूकून वर गेला होता. एका इन्स्टाग्राम प्रवक्त्याने सांगितले की, “जगभरात कोट्यावधी लोक इन्स्टाग्राम वापरतात आणि त्यांच्यावर काम करत असताना आपण बर्याचदा चुका करतो. संडरलँडने आमचे धोरण नियम मोडले आहेत आणि आता आम्ही त्यांचे खाते बंद केले आहे. ते म्हणाले की, संदरलँडचा आमच्या कंपनीतील अधिकाऱ्यांशी संबंध नाही आणि तिला विशेष प्राधान्य दिल्याचे दावे चूकीचे आहेत. दरम्यान, संदरलँडचे इन्स्टाग्रामवर व्हेरीफाइट अकाऊंट आहे, ज्यावर तिचे जवळजवळ 22 लाख फॉलोअर्स होते.
संदरलँड म्हणाली, ‘एवढ्याशा गोष्टीसाठी अकाउंट बॅन करणे, माझ्यासाठी खूप आश्चर्याची बाब आहे. खरं सांगायचं तर इन्स्टाग्रामचा सीईओ कोण आहे हे देखील मला माहिती नाही. मी माझ्या आयुष्यात या व्यक्तीला भेटले देखील नाही.