porn film कलेक्शन डिलिट करणे वडिलांना पडले महागात, जाणून घ्या प्रकरण

पोलीसनामा ऑनलाईन – मुलाने मोठ्या संख्येने अडल्ट फिल्मचे (Adult film) केलेले कलेक्शन नष्ट करणे वडिलांना महागात पडले आहे. अडल्ट फिल्मचे कलेक्शन डिलिट केले म्हणून मुलाने वडिलाच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. त्याने चक्क वडिलांकडे 86 हजार डॉलर्स अर्थात 60 लाख रुपयांची भरपाई मागितली आहे. अमेरिकेतील ( America) मिशीगन येथे ही घटना घडली.

चार्ली असे या मुलाचे नाव आहे. याबाबतची माहिती अशी की, चार्ली हा आपल्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंर ग्रॅंड व्हेव्हनमध्ये राहणा-या त्याच्या आई- वडिलांच्या घरी राहण्यासाठी आला होता. तो आई- वडिलांच्या घरी 10 महिने राहिला. त्यानंतर घरात काहीतरी काम सुरु झाल्यानंतर त्यांनी ते घर सोडून इंडियानामध्ये गेला. काही दिवसांनी चार्लीच्या आई-व़डिलांनी इंडियाना येथे जाऊन त्याचे काही राहिलेले सामान परत केले. मात्र त्यांनी त्याला 12 बॉक्स परत केले नाहीत. ज्यात अडल्ट फिल्मचे कलेक्शन होते. जेंव्हा त्यांनी त्या बॉक्सबाबत वडिलांना विचारले तेंव्हा वडिलांनी ते नष्ट केल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. तक्रारीत म्हटले आहे की, ते कलेक्शन 20 लाखांचे होते. त्याने वडिलांकडे 60 लाखांची मागणी केली आहे.

चार्लीच्या आई-वडिलांनी सांगितले की, त्या 12 बॉक्समधील अडल्ट फिल्म कलेक्शन आणि 2 बॉ्क्समधील सेक्स टाईज (Sex Toys) नष्ट केले. चार्लीने त्यांना मेल करून देखील याबाबत विचारणा केली. त्याने असे म्हटले होते की, तुम्हाला माझ्या वस्तूची अडचण होती तर मला सांगायला पाहिजे होते. मी नसतांना त्या नष्ट करायला नको होत्या. चार्लीच्या वडिलांनी सांगितले की, या वस्तू नष्ट करण्यामागे त्यांच्या मुलांचा मानसिक स्वास्थाबाबत असणारी चिंता होती. वडिलांच्या माहितीनुसार, पॉर्न फिल्म पाहण्याच्या सवयीमुळे आणि पॉर्नोग्राफी विकण्यामुळे त्याला कॉलेजमधून काढून टाकण्यात आले होते.