कामाची गोष्ट ! पावडर मिसळून विकलं जातंय सोनं, फसवणूकीपासून वाचण्यासाठी जाणून घ्या

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – सणासुदीदरम्यान सोने खरेदीकडे ग्राहकांचा ओढा असतो. त्यामुळे सोन्याची मागणी वाढली आहे. त्या बरोबर सोन्याच्या होणाऱ्या फसवणूकची म्हणजेच सोन्यात होणाऱ्या इतर धातूंच्या जास्त मिलावटीचा प्रकार वाढला आहे. जर तुम्ही देखील सोने खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी ही बाब महत्वाची आहे.

दिल्लीतील काही सोनार सोन्यात एका खास प्रकारच्या पावडरची मिलावट करत असल्याचा प्रकार समोर आला. ही पावडर सोन्यात मिसळली की सोन्याची तपासणी करताना देखील त्याचा पत्ता लागत नाही. सिमेंट सारखी ही पावडर परदेशातून भारतात येत आहे. चांदनी चौकच्या कूटा महाजनीमधील द बुलियन अ‍ॅण्ड ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष योगेश सिंघल यांनी देखील सांगितले की त्यांच्याकडे अशा तक्रारी आल्या आहेत.

या महिन्यात तुम्हाला ज्वेलर्सकडे डिस्काऊंट आणि लकी ड्रा देखील मिळेल, परंतू त्यापासून दूर रहा. कारण पहिल्यांदा ही मिलावट फक्त सोन्याच्या चैनमध्ये केली जात होती, परंतू आता इतर दागिण्यात देखील मिलावट होताना दिसत आहे. दागिणे पूर्णता वितळवल्यावर या मिलावटीचा प्रकार समोर येतो.

हॉलमार्क असलेले दागिणे खरेदी करा –
नेहमी हॉलमार्क असलेले दागिणे खरेदी करा, हॉलमार्क असलेले सोने याची गॅरंटी देतात की दागिणे शुद्ध सोन्याचे आहेत कारण हे निशाण भारतीय मानक ब्यूरो द्वारा देण्यात येते. जर हॉलमार्क असलेले दागिण्यावर 999 लिहिलेले असेल तर सोने 99.9 टक्के शुद्ध असते, जर हॉलमार्कबरोबर 916 अंक लिहिलेला असेल तर तो दागिणा 22 कॅरेटचा असतो आणि 91.6 टक्के शुद्ध असते.

कमी किंमतीबाबत रहा सावधान –
सोन्याचे दागिणे कधीही 24 कॅरेटचे नसतात. ते 22 कॅरेटचे बनतात आणि कायमच 24 कॅरेट सोन्यापेक्षा स्वस्त असते. यामुळे जेव्हा दागिणे खरेदी करतात तेव्हा सोनार तुमच्याकडून 22 कॅरेटच्या हिशोबाने पैसे घेतो. सोनाराकडून सोने घेताना सोन्याची शुद्धता आणि किंमत बिलावर नक्की लिहून घ्या.

पक्के बिल घ्या –
शिक्के किंवा दागिणे खरेदी करताना पैसा वाचवण्याच्या नादात पक्के बिल घेणे टाळू नका. अनेकदा दागिणे मोडीत काढताना खरेदी वेळी पक्के बिल घेतले नसेल तर सोनार आपली पावती ओळखू शकणार नाही.
शुद्धता प्रमाणपत्र नक्की घ्या –
सोन्याचे दागिणे खरेदी करताना शुद्धता प्रमाणपत्र न विसरता घ्या. प्रमाण पत्रात सोन्याची कॅरेट क्वॉलिटी देखील नक्की तपासा.

Visit : Policenama.com