सांगलीत 45 हजारांचा भेसळयुक्त वाटाणा, तेल जप्त

सांगली :  पोलीसनामा ऑनलाइन – अन्न व औषध प्रशासन विभागाने शहरातील एका मॉलमध्ये छापा टाकून भेसळयुक्त मोहरी तेल व वाटाण्याचा साठा जप्त केला. त्याची किंमत ४४ हजार ७२१ इतकी आहे. त्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या पथकाने दि. २८ फेब्रुवारी रोजी एका मॉलवर छापा टाकला. त्यावेळी पथकाने मोहरी तेल व वाटाणा याचे नमुने घेऊन ३७२ किलोचा साठा जप्त केला. या पदार्थाचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

दरम्यान मॉलमध्ये स्वच्छता ठेवण्यात येत नसल्याचे पथकाला आढळून आले. तसेच बुरशी आलेली फळे विक्रीसाठी ठेवल्याचे आढळले. अन्न सुरक्षा मानके कायद्यातील तरतूदीनुसार मॉल प्रशासनाला नोटीस पाठविण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.