Adv. Gunaratna Sadavarte | शरद पवार यांच्या घरावरील हल्ला प्रकरण ! मुंबई पोलिसांकडून ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर राज्यातील घडामोडी वेगाने घडताना दिसत आहेत. दुपारी झालेल्या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) 107 लोकांवर गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) केली आहे. त्यानंतर आता कर्मचाऱ्यांचे वकील ॲड. गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunaratna Sadavarte) यांना त्यांच्या परळ येथील राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले आहे. सरकारी कामात अडथळा अणल्याचा गुन्हा त्यांच्यावर नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे ॲड. गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunaratna Sadavarte) यांना अटक करण्यात आली आहे.

 

 

एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST Employees) आक्रमक आंदोलन विरोधात (Agitation) 107 आंदोलकांना गावदेवी पोलिसांनी (Gavdevi Police) ताब्यात घेतले आहे. साधारण 7.30 वाजताच्या सुमारास 4 ते 5 पोलीस गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunaratna Sadavarte) यांच्या घरी पोहोचले आणि ताब्यात घेतले. शरद पवार यांच्या घराबाहेर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सदावर्ते यांची चौकशी (Inquiry) केली जाणार आहे. दरम्यान, त्यांना अटक करण्यात आली आहे.

 

गावदेवी पोलीस ठाण्यात (Gavdevi Police Station) ॲड गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज झालेल्या आंदोलनात एक पोलीस अधिकारी जखमी झाला आहे. त्यामुळे ॲड. सदावर्ते यांच्यावर आयपीसी कलम 353 (सरकारी कामात अडथळा, 120 B समान हेतू) या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

माझ्या जीवाला धोका

सदावर्ते यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ते म्हणाले, कोणतीही नोटीस न देता मला ताब्यात घेतलं आहे,
व्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
मला ताब्यात घेताना कोणत्याही प्रक्रियेचे पालन करण्यात आले नाही.
माझ्या जीवाला काही धोका निर्माण झाला तर त्याला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil)
जबाबदार असतील, असेही ते म्हणाले.

 

Web Title :- Adv Gunaratna Sadavarte | advocate gunaratna sadavarte detained by mumbai police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा