Adv. Gunaratna Sadavarte | अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना ‘ती’ चूक भोवली, वकीलीची सनद दोन वर्षांसाठी रद्द

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अॅड. गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunaratna Sadavarte) यांची दोन वर्षांकरीता वकीलीची सनद रद्द (Lawyer’s Charter Cancelled) करण्यात आली आहे. अॅड. सुशील मंचरकर (Adv. Sushil Mancharkar) प्रकरणात सदावर्ते यांची दोन वर्षे वकीलीची सनद रद्द केली आहे. सदावर्ते (Adv. Gunaratna Sadavarte) यांनी वकिलाचा ड्रेस परिधान करुन मुंबईत विविध आंदोलनात हजेरी लावली होती. याबाबत अॅड. मंचरकर यांनी दाखल केलेल्या केस प्रकरणात त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
अॅड. गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunaratna Sadavarte) यांनी सार्वजनिक ठिकाणी गाऊन घालण्याच्या कृत्यामुळे समस्त वकिलांची प्रतिमा मलिन होते, असे म्हणत मंचरकर यांनी सदावर्ते यांच्या विरोधात शिस्त पालन याचिका (Disciplinary Petition) दाखल केली होती. याबाबत बार कौन्सिलच्या (Bar Council) तीन सदस्यीय समितीने निकाल देताना सदावर्ते यांची वकिलीची सदन दोन वर्षांसाठी रद्द केली आहे. हा सदावर्ते यांना मोठा धक्का मानला जात आहे. बार कौन्सिलच्या या निर्णयामुळे सदावर्ते यांना पुढील दोन वर्षे वकिली करता येणार नाही.
मंचरकर म्हणाले, 2022 मध्ये सदावर्ते यांच्या विरोधात बार कौन्सिलमध्ये तक्रार केली होती.
नियम सात नुसार वकीलांनी सार्वजनिक ठिकाणी बँड किंवा गाऊन घालणे प्रतिबंध केले आहे.
नियम सात मध्ये असा नियम असताना आझाद मैदानावर (Azad Maidan) त्यावेळी सुरु असलेल्या आंदोलनात
गाऊन आणि बँड घालून आंदोलनस्थळी उपस्थित राहत, डान्स केला होता. त्यामुळे वकिलांची प्रतिमा डागाळली होती. यावरुन मी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.
Web Title :- Adv. Gunaratna Sadavarte | gunaratna sadavarte lawyers charter revoked
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Sushama Andhare | संजय शिरसाटांना ‘ते’ विधान भोवणार?, सुषमा अंधारेंकडून महिला आयोगाकडे तक्रार