Adv Gunaratna Sadavarte Wife Jayashree Patil | वकील गुणरत्न सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटील यांना कोर्टाकडून मोठा दिलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Adv Gunaratna Sadavarte Wife Jayashree Patil | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या मुंबईतील (Mumbai) निवासस्थानावर हल्ला झाला होता. या प्रकरणात वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या पत्नी वकील जयश्री पाटील (Jayashree Patil) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. काही काळ त्या फरार झाल्या होत्या. मात्र अटकेच्या भीतीने त्यांनी न्यायालयात (Mumbai Court) याचिका दाखल केली आणि त्यानंतर पार पडलेल्या सुनावणीमध्ये जयश्री सदावर्ते यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

याचिका दाखल केल्यानंतर अशातच मुंबई सत्र न्यायालयाने (Mumbai Sessions Court) जयश्री पाटील यांना अटकेपासून दिलासा दिला आहे. येत्या 29 एप्रिलपर्यंत जयश्री पाटील यांना अटक न करण्याचे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे सातारा न्यायालयाने (Satara Court) सदावर्ते यांना कोठडी सुनावली होती. आज मुदत संपली असली तरी मात्र गुणरत्न सदावर्ते यांना आजही दिलासा मिळाला नाही.

गुणरत्न सदावर्ते यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये (Judicial Custody) वाढ करण्यात आली आहे. पोलिसांनी घडलेल्या प्रकरणाची सखोल तपासणीसाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळत सदावर्ते यांना आणखी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, सदावर्ते यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांचा आता जामीनाचा मार्गही खुला झाला आहे.
जयश्री यांनी 29 तारखेपर्यंत अटक न करण्याचे आदेश आहेत. त्यामुळे या प्रकरणात
पुढे काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Web Title :- Adv Gunaratna Sadavarte Wife Jayashree Patil |
Adv Gunaratna Sadavarte Wife Jayashree Patil got big relief from court protection from arrest till april 29


Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | ‘इतना खर्चा होता है, हमे कुछ पैसा कमाना होगा’ ! पतीनेच आपल्या पत्नीचे अश्लील फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड करण्याची व तलाक देण्याची दिली धमकी

Raj Thackeray Security | मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंना धमकीचा कॉल, जीवाला धोका असल्याचा दावा

Pune Crime | ‘हप्ता दिला नाही तर जीवंत सोडणार नाही, गोडाऊन जाळून टाकू’ ! धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या आरोपीला अटक