राजकीय फायद्यासाठी युद्धाचे भांडवल ; राज्यातील ‘या’ बड्या नेत्याचा मोदींवर घणाघात

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून युद्धासारख्या गंभीर परिस्थितीचे राजकीय फायद्यासाठी भांडवल केले जात आहे, असा घणाघाती आरोप वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी नगर येथील जाहीर सभेत बोलताना केला आहे.
अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले की, सध्या देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे व सरकार जो आभास निर्माण करीत आहे. त्याकडे उघड्या डोळ्यांनी पाहून शांतपणे निर्णय घेतला पाहिजे. उद्याची निवडणूक मोठी आणि महत्वाची आहे. त्याचाही आपण विचार केला पाहिजे. यापूर्वी अनेक छोटे-मोठे युद्ध झाले. परंतु कुठल्याही सरकारने युद्धाचे भांडवल केले नाही. मात्र हे सरकार जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी युद्धाचे भांडवल करीत आहे.

‘कोणाला काहीही बोलू द्या, मी खासदार होणारच’ 

‘..आता घुसून मारा’

भविष्यात कुणाचेही सरकार आले तरीही पाकिस्तान विरोधात भूमिका घ्यावीच लागेल. या सरकारला मी आवाहन करत आहे की आता घुसलंच आहेत, तर थेट घुसा. माघार घेऊन नका, अन्यथा सर्वत्र छी-थू होईल. पाकिस्तानची हिम्मत आणखी वाढेल. युद्ध जिंकण्यासाठीच लढायचे असते. होणा-या परिणामांची चिंता करायची नसते, असेही आंबेडकर म्हणाले.
नुसती 56 इंच छातीची भाषा चालत नाही

युद्ध हे पहिल्यांदा डोक्यामध्ये जिंकावं लागते. नुसतीच छप्पन इंच छातीची भाषा बोलून चालत नाही. पंतप्रधानांच्या कारवाईत मला दिशा आणि उद्देश दोन्हीही दिसत नाहीत. केवळ स्वतःचा इगो सांभाळण्यासाठी केलेला खटाटोप दिसतो. लोकसभेत वंचित बहुजन आघाडीचे खासदार निवडून आले तर ते परदेशी धोरण तयार करण्यासाठी मदत करतील, असेही ते म्हणाले.