अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांचा पुतळा जाळून निषेध

पाथर्डी : पोलीसनामा ऑनलाईन

राष्ट्रवादीचे सरचिटणीस अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याबद्दल अहमदनगर येथील पत्रकार परिषदेमध्ये आरोप केले होते. याच्या निषेधार्थ भाजप पदाधिका‍ऱ्यांनी कल्याण विशाखापट्टणम महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. तसेच अ‍ॅड. ढाकणे यांच्या पुतळ्याचे दहन केले.

[amazon_link asins=’B01DEWVZ2C,B01FXJI1OY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7fd50332-b195-11e8-a6c5-170fde18ed4e’]

अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांनी ऊसतोडणी कामगार आंदोलनाबाबत व वंजारी समाज आरक्षणसंबधी पत्रकार परिषद घेवून आपले मत मांडले होते. त्यामध्ये त्यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे याच्यावर आरोप केले. त्याच्या निषेधार्थ त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.

जाहिरात

या आंदोलनाबाबत माहिती देताना माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ खेडकर म्हणाले की, प्रताप ढाकणे हे वाचाळ कार्यकर्ते आहेत. मुंडे साहेबांबद्दल बोलण्याची प्रताप ढाकणे यांची उंची नाही. ढाकणे यांनी आधी ग्रामपंचायतला निवडून यावे. मग मुंडे साहेबांबद्दल बोलावे. २४ वर्षांनी ढाकणे यांना वंजारी समाजाचे नुकसान झाल्याची आठवण झाली. यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी निषेध नोंदवत यापुढे स्व. गोपीनाथ मुंडे व पंकजा मुंडे यांच्यावर जर आरोप केले तर खपवून घेणार नाही, असा इशारा दिला. यावेळी नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, संजय बडे, भाजपा तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, उपसभापती विष्णूपंत अकोलकर, मुकुंद गर्जे, भाजपा महिला तालुकाध्यक्ष काशीताई गोल्हार, नगरसेविका मंगल कोकाटे, मनीषा घुले, नामदेव लबडे, अजय भंडारी, भगवान साठे, संजय कीर्तने आदी उपस्थित होते.

आज निकाल : समलैंगिक संबंध कायदेशीर की बेकायदेशीर?