नुकसान भरपाई तत्वतः नको सरसकट द्या : अ‍ॅड. श्रीकांत करे

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – इंदापूर तालुक्यात अतिवृृष्टीने नुकसान झालेल्या शेतपीकांचे पंचनामे करण्याच्या नावाखाली शासनाकडून पुन्हा अटी व शर्ती टाकून शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे. फक्त ठराविक द्राक्ष व कांदा या सारख्या निवडक पिकांचे तेही अनेक अटी टाकून पंचनामे केले जात आहेत. त्यामुळे इतर पीकधारक बहुसंख्य शेतकरी यातून बाजूला पडला जाणार असुन तसे न होता शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या शेतपिकांचे सरसकट पंचनामे हे जाचक अटी व शर्ती रद्द करून करण्यात यावेत अशी मागणी शेतकरी सुकाणु समितीचे पुणे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. श्रीकांत करे यांनी इंदापूर येथे बोलताना केली.

शासनाच्या कर्जमाफी योजने सारख्या ५२ अटी लावून १५ पाणी फाॅर्म शेतकऱ्यांना भरायला लावून शेतकरी वर्गाची फसवणूक केली जात आहे. सरकारचे पंचनामे करण्याचे धोरण हे चुकीचे आहे. दोन महिन्यांपासून पाऊस आहे आणि इतक्या उशिरा पंचनामे म्हणजे ‘वराती मागून घोडे’ अशी अवस्था सध्या शासनाकडून इंदापूर तालुक्यात सुरू आहे.

यंदा पाऊस सरासरीपेक्षा जास्त झाला आहे. या पावसाने शेतकर्‍यांच्या शेतपिकांचे प्रचंड नुकसान केले आहे. शेतकर्‍यांची अनेक हातातोंडाशी आलेली पिके नासुन गेली आहेंत. तर फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तर काही ठिकाणी पावसाने पेरणी होऊ शकली नाही. अनेक लहान जनावरे मृत पावले आहेत, दुष्काळाने पिचलेला बळीराजा आता ओल्या दुष्काळात हताश झाला आहे. त्यामुळे शासनाने नुसते विनाकारण पंचनामे व कागदोपत्री घोडे नाचवण्याच्या भानगडीत पडू नये तर अडचणीत असलेल्या बळीराजाला तात्काळ मदत द्यावी व शेतकर्‍यांना सरसकट कर्ज माफी द्यावी अशी मागणी अ‍ॅड. श्रीकांत करे यांनी इंदापूर येथे बोलताना केली.

Visit : Policenama.com